मुंबई

विजेच्या लपंडावामुळे नागरिक घामाघूम

CD

तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : तापत्या उन्हात अंगाची काहिली होत असताना पंखे, वातानुकूलित यंत्रांविना राहण्याची वेळ नवी मुंबईतील नागरिकांवर आली आहे. नवी मुंबईच्या गावठाण, झोपडपट्टीसह शहारी भागात सातत्याने वीज खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्री-अपरात्री विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. विद्युतवाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. उन्हाळ्यात विजेवर चालणाऱ्या उपकारणामुळे भार वाढला जातो, असे वाशी महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय पोळ यांनी सांगितले.
घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे गाव, कोपरी गाव आणि त्यालगतच्या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. चार ते पाच तास सलग वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिक हैराण झाले आहेत. रात्रीच्या वेळेस खंडित होणारा वीजपुरवठा हा दोन ते तीन तासांनी सुरळीत होतो. विजेवर अनेक दैनंदिन कामे अवलंबून असतात. वीज असेल तरच पाणीपुरवठा होतो; मात्र काही ठिकाणी पाणीपुरवठा होण्याच्या वेळेलाच बत्ती गुल होण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे वीजही नाही आणि पाणीदेखील मिळत नाही, अशी अवस्था झाली आहे. ज्या वेळी वीजपुरवठा पूर्ववत होतो, त्या वेळी पाण्याची वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे नवी मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनमानावरदेखील त्याचा परिणाम होतो. उन्हाळा चालू असल्याने परिसरात डासांची पैदासही वाढली आहे. परिणामी वीज नसल्याने पंख्याअभावी डासांच्या उपद्रवामुळे मलेरिया आणि डेंगीचे रुग्ण वाढू लागले आहेत. रात्रभर वीज नसल्याने रहिवाशांना रात्र जागून काढावी लागत आहे.
---------------
खोदकामांमुळे भूमिगत वाहन्या नादुरुस्त
नवी मुंबईत भूमिगत वीजवाहिन्यांचे मोठे जाळे आहे. त्यामुळे जागोजागी सुरू असलेल्या विकासकामांच्या खोदकामांमुळे अनेकदा वाहिन्यांना फटका बसून वीजप्रवाह खंडित होत असून, हे प्रमुख कारण ठरत आहे. झोपडपट्टीच्या भागात दाटिवाटीच्या वाहिन्या व उन्हाळ्यातील अधिक भाराचा फटका अनेकदा बसतो. त्यामुळे ऐन उकाड्यात पंख्याविना राहावे लागत आहे.
---------------------
सोमवारी दिवस-रात्र लपंडाव सुरूच
कोपरखैरणे सेक्टर १९ येथे सोमवारी रात्री तब्ब्ल तीन तास विद्युतपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे रहिवाशांना रात्र जागूनच काढावी लागली. तुर्भे गावातही सोमवारी दुपारी वीज गायब झाली होती. त्यानंतर कोपरखैरणे सेक्टर १९ येथेही रात्री तीन तास बत्ती गुल झाली होती. वाशी सेक्टर नऊ येथे दुपारी दोन तास वीज गेल्याने नागरिक पुरते हैराण झाले होते. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी ट्रान्स्फॉर्मर उडाल्याने कोपरी गाव आणि सेक्टर २६, २८, २९ परिसर अंधारात होता. त्यामुळे गावकऱ्यांना घरात राहणे कठीण झाले होते. गाव, कॉलनीमधील नागरिक रस्त्यावर उतरले होते. दहा-बारा दिवसांपूर्वी तुर्भे मॅफको विभागामध्ये रात्रीच्या वेळी विद्युतपुरवठा अनेक तास खंडित होत असल्याने नागरिकांची पुरती झोप उडाली होती. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रात्री साडेबारा वाजता महावितरणच्या मॅफको कार्यालयासमोर रस्ता अडवून निदर्शने केली होती.
----------------
दररोजची समस्या
मागील आठवड्यापासून वातावरणातील बदलामुळे उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. परिणामी दिवसा आणि रात्रीदेखील उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. अशा परिस्थितीत मागील दोन आठवड्यांपासून महावितरणच्या मेफको विभागांतर्गत तुर्भे कॉलनी, तुर्भे गाव सेक्टर २० ते २४ या परिसरात दररोज विद्युतपुरवठा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे खंडित होत आहे. विशेषतः दिवसा वीज गेल्यावर व्यावसायिकांनाही त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्येही संतापाची भावना निर्माण झाली आहे.
---------------
सध्या उन्ह अधिक तापू लागले आहे. त्यामुळे उष्णतादेखील वाढली आहे. दरवर्षी एप्रिलमध्ये मुलांच्या परीक्षा संपून उन्हाळी सुट्ट्या लागायच्या. यंदा मात्र २६ एप्रिलपर्यंत परीक्षा असल्यामुळे मुलांना वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर उकाड्यात व मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करावा लागत आहे. दोन तासानंतरच वीज येते.
- महेश शिंदे, रहिवासी, तुर्भे
-----------------
रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे दैनंदिन जीवनावर खूप परिणाम होत आहे. उन्हाळ्यात डासदेखील वाढल्याने एकीकडे उकाडा; तर दुसरीकडे डासांचे चावे सहन करावे लागतात. महावितरणकडून किमान उन्हाळ्यात तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
- प्रणाली यादव, विद्यार्थिनी, वाशी सेक्टर २६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT