मुंबई

कचरा वेचक महिलांचे पालिकेसमोर आंदोलन

CD

कचरावेचक महिलांचे पालिकेसमोर आंदोलन
दुर्घटना टाळण्यासाठी प्रवेशबंदी; पालिकेचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता, १५ : सीपी तलाव येथील कचरा हस्तांतरण केंद्रावर एका कचरावेचक महिलेला जेसीबीचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर पालिका प्रशासनाने खबरदारी म्हणून कचराभूमीवर कचरावेचक महिलांना प्रवेशबंदी केली. पालिकेच्या या निर्णयाविरोधात कचरावेचक महिलांनी मंगळवारी (ता. १५) पालिकेसमोर आंदोलन केले. तसेच या निर्णयामुळे उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत कचरावेचक महिलांनी सांगितले.

ठाण्यातील वागले इस्टेट येथील सीपी तलाव हस्तांतरण केंद्र आहे. या केंद्रावर गेल्या अनेक वर्षांपासून या हस्तांतरण केंद्रावर कचरा टाकण्यात येत आहे. येथे कचऱ्याचा डोंगर निर्माण झाला आहे. अशातच या सीपी तलाव हस्तांतरण केंद्राच्या आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरू लागले आहे. या प्रकारामुळे स्थानिकांनी येथे कचरा टाकण्यास विरोध केला होता. यानंतर पालिकेने या हस्तांतरण केंद्रावरील कचरा उचलण्यास सुरुवात केली आहे. कामादरम्यान ३१ मार्चला राजश्री जाधव या कचरावेचक महिलेचा डम्परच्या धडकेत मृत्यू झाला. या महिलेच्या कुटुंबीयांना भारतीय असंघटीत मजूर कामगार संघटनेने दोन लाखांची, तर ठाणे महापालिकेने पाच लाखांची मदत केली होती. तसेच तिच्या मुलाला महापालिकेत कंत्राटी पद्धतीने नोकरी देण्यात आली आहे. अशी दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी पालिकेकडून या ठिकाणी काळजी घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी कचरावेचक महिलांना प्रवेशबंदी केली आहे.

पालिकेच्या निर्णयाविरोधात भारतीय असंघटित मजूर कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली कचरावेचक महिलांनी मंगळवारी पालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. या वेळी पालिका प्रशासनाच्या निर्णयामुळे २०० महिला कचरावेचकांचे कुटुंब उद्ध्वस्त होणार असल्याचे सांगत जीवन-मरणाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. या कचऱ्यातून अनेक पुनर्वापर वस्तू, कचरा गोळा करून २०० कचरावेचक महिला आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. त्यामुळे त्यांना कचरा हस्तांतरण केंद्रावर प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी कचरावेचक महिलांनी या वेळी केली.

सीपी तलाव हस्तांतरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात कचरा उचलण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी दुर्घटना घडू नये, यासाठी कचरावेचक महिलांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होऊ नये, यासाठी काय करता येईल, यावर विचार सुरू आहे.
- मनीष जोशी, उपायुक्त, ठामपा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

BCCI ला सचिन तेंडुलकर नकोसा झालेला? निवृत्तीबाबत विचारणा केलेली; मास्टर ब्लास्टरला बसलेला धक्का, १३ वर्षानंतर सत्य समोर...

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

LPG संपला, चपाती-भाकऱ्या भाजायच्या कशा? रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणात कपात; रुग्णांचे हाल

Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात ! भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली

SCROLL FOR NEXT