मुंबई

वाहतूक पोलिसांना तिसरा डोळा

CD

भाईंदर, ता. १५ (बातमीदार) : वाहतूक पोलिस आणि वाहनचालक यांच्यात अनेकवेळा खटके उडाल्याचे पाहायला मिळते. अनेक प्रसंगात दोघेही एकमेकांवर आरोप करतात. कधी-कधी बाब हमरीतुमरीवरही येते, मात्र यापुढे दोघांनाही जबाबदारीने वागावे लागणार आहे. दोघांचेही कृत्य अथवा संवाद आता कॅमेऱ्यात बंदिस्त होणार आहेत, तसेच कॅमेऱ्याद्वारे नियंत्रण कक्षातूनही नजर ठेवली जाणार आहे. याचे कारण म्हणजे वाहतूक पोलिसांना त्यांच्या शरीरावर लावण्यासाठी विभागाकडून कॅमेरे (बॉडी वर्न कॅमेरे) देण्यात येत आहेत. या कॅमेऱ्यात दोघांमधील संवाद व दृश्य बंदिस्त होणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या १०० दिवस कृती आराखड्याच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांनी संपूर्ण आयुक्तालयाच्या क्षेत्रातील वाहतूक पोलिसांसाठी बॉडी वर्न कॅमेरे उपलब्ध करून दिले आहेत. मिरा-भाईंदर व वसई-विरार क्षेत्रात २०० वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना हे कॅमेरे देण्यात येणार आहेत. त्याला बॉडी वर्न व्हिडिओ अथवा बॉडी वर्न कॅमेरा असेही म्हटले जाते. हे उपकरण वाहतूक पोलिस कर्तव्य करीत असताना त्याच्या छातीवर, खांद्यावर अथवा कमरेला लावलेले असेल. यातून वाहतूक पोलिसांचा जनतेशी झालेला संवाद आणि व्हिडिओ रेकॉर्ड होणार आहे. हे एक वेअरेबल ऑडिओ-व्हिडिओ अथवा फोटोग्राफिक रेकॉर्डिंग सिस्टीम असून, या उपकरणाच्या माध्यमातून वाहतूक पोलिस एकमेकांशी सहजपणे जोडले जाणार आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या वाहतूक पोलिस अधिकारी व अंमलदारांना घटनास्थळावरील घटना व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्ड करण्यासाठी वापरात येणार आहे. या उपकरणामुळे पोलिस अधिकारी, अंमलदार व नागरिक अशी दोघांचीही जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी या उपकरणाचा उपयोग होणार आहे.

पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते या उपक्रमाची मंगळवारी (ता. १५) सुरुवात करण्यात आली. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयातील वाहतूक विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना बॉडी वर्न कॅमेऱ्यांचे वाटप करण्यात येत आहे. या वेळी अतिरिक्त आयुक्त दत्ता शिंदे, उपायुक्त सुहास बावचे उपस्थित होते.

उपकरणाचे फायदे :
- वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला उपकरणाच्या नियंत्रण कक्षाशी संवाद साधता येणार आहे अथवा नियंत्रण कक्षाकडून वाहतूक कर्मचाऱ्यालाही सूचना देता येणार आहे. एखादा चालक नियम मोडून पुढे गेला असेल, तर संबंधित कर्मचाऱ्याला या उपकरणाच्या माध्यमातून पुढील वाहतूक कर्मचाऱ्याला सूचना देता येणार आहे. त्यासाठी वॉकी-टॉकी उपकरणाची आवश्यकता नाही.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे एखाद्या आपत्कालीन घटनेमध्ये अथवा वाहतूक पोलिसांकडून एखाद्या वाहनाचा पाठलाग केला जात असेल, तर या उपकरणातील आपत्कालीन बटन दाबून कर्मचाऱ्याला त्याची सूचना नियंत्रण कक्षाला देता येणार आहे. उपकरणात जीपीएस लोकेशन सुविधा असल्यामुळे संबंधित ठिकाणी पोलिसांचे पथक रवाना करणेही शक्य होणार आहे.
- वाहतूक कोंडीचे नाके, महामार्ग किंवा इतर संवेदनशील ठिकाणावरील घटना लाइव्ह रेकाॅर्ड करण्यासाठीदेखील या उपकरणाचा उपयोग होणार आहे, शिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कॅमेऱ्यातील चित्रीकरण पुरावा म्हणूनही वापरता येणार आहे.

आजच्या डिजिटल युगात वाहतूक पोलिसांना आपले कर्तव्य अधिक प्रभावीपणे करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. कामकाजातील पारदर्शकता वाढवणे आणि पोलिस-जनता संबंध मजबूत करणे आहे, हे बॉडी वर्न कॅमेरा उपकरणाचे उद्दिष्ट आहे.
- मधुकर पांडे, पोलिस आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Solapur News: साेलापूरातील ‘त्या’ सात ग्रामसेवकांवर होणार निलंबनाची कारवाई; मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम घेणार निर्णय!

Global Oil Shortage Reasons : सर्वांत मोठा तेलसाठा खुला होणार! ऊर्जासंस्था देणार 40 कोटी बॅरल; वाचा काय आहे 'आयईए'चा प्लॅन?

Farooq Abdullah Attack : फारूख अब्दुल्लांवर हल्ला करणारा कमल सिंग कोण आहे, कशामुळे झाडली गोळी ? सांगितले धक्कादायक कारण

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये शनिवारी हिंदूहित रक्षा मेळावा; मंत्री नीतेश राणे मार्गदर्शन करणार

SCROLL FOR NEXT