भिवंडीत दोन अल्पवयीन बेपत्ता
भिवंडी, ता. १५ (वार्ताहर) : शहरात मागील काही दिवसांत अल्पवयीन मुलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यामुळे पालकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. अशाच दोन बेपत्ता झालेल्या मुलांच्या तक्रारी दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. १४) दाखल केली आहे. यात एका मुलीचा समावेश आहे.
काप कणेरी बरफ गल्ली येथील हुसेन अपार्टमेंट या इमारतीत राहणारी सायमा मोहम्मद शफिख खान (वय १५) ही अल्पवयीन मुलगी सकाळी पाऊणे सात वाजताच्या सुमारास घरात कुणालाही न सांगता घरातून निघून गेली. बराच वेळ झाल्यानंतरही ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी परिसरात, आजूबाजूच्या लोकांकडे, तिचे मित्र-मैत्रिणी व नातेवाईक यांच्याकडे चौकशी करून शोध घेतला, परंतु ती सापडली नाही. त्यामुळे आई मुन्नी खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून भिवंडी शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद केली आहे.
दुसऱ्या प्रकरणात शांतीनगर परिसरातील रेहमतपूर येथील अनियाबानो अन्सारी यांचा रेहान (वय १६) हा मुलगा रविवारी (ता. १३) सकाळी ९ वाजता कामाला जातो सांगून घरातून निघून गेला तो सायंकाळपर्यंत घरी परतला नाही. त्याचा शोध घेऊन ही न सापडल्याने अखेर आईने शांतीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी सायंकाळी हरवल्याची नोंद केली. ही दोन्ही बेपत्ता झालेले अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.