ट्रेलरच्या धडकेत आठवर्षीय चिमुरडीचा मृत्यू
नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : जेएनपीएहून पनवेलकडे जाणाऱ्या भरधाव ट्रेलरने आई व भावंडासह रस्ता ओलांडून जाणाऱ्या आठवर्षीय चिमुरडीला धडक दिल्याची घटना सोमवारी (ता.१४) सायंकाळी प्री-गेट समोरील सिग्नलजवळ घडली. या धडकेत या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर नाव्हाशेवा पोलिसांनी ट्रेलरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत चिमुरडीचे नाव ज्योती भागवत शिंदे (वय ८) असे असून, ती उरणमधील नगघर फाटा येथील झोपडपट्टीत आई-वडील व दोन भावंडासह राहत होती. ज्योती सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आपली आई व दोन भावंडांसह वडघर फाटा येथील झोपडपट्टीत जात होती. या वेळी हे चौघेही प्री-गेट समोरील जेएनपीए-पनवेल रस्ता ओलांडून वडघर झोपडपट्टीच्या दिशेने जात असताना, जेएनपीए येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रेलरने ज्योतीला धडक दिली. या अपघातात ज्योती गंभीर जखमी होऊन काही वेळात तिचा मृत्यू झाला. या अपघातानंतर न्हावा-शेवा पोलिसांनी ज्योतीला धडक देणाऱ्या ट्रेलरचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.