मुंबई

लोकलवर दगड फेकल्याने प्रवासी जखमी

CD

नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील रबाळे ते ऐरोली रेल्वेस्थानकादरम्यान अज्ञात व्यक्तीने धावत्या लोकलवर दगड फेकला. यामध्ये लोकलमधून प्रवास करणारा प्रवासी गणेश आनंदा खरात (३५) हा जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. १२) रात्री घडली. दगड गणेशच्या डोळ्याच्या खाली लागल्याने त्याचा डोळा थोडक्यात वाचला आहे. या घटनेनंतर वाशी रेल्वे पोलिसांनी लोकलवर दगड फेकणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
जखमी गणेश खरात हा कल्याण पूर्वेकडे कुटुंबासह राहण्यास असून, तो घणसोली येथील कॉल सेंटरमध्ये कामाला आहे. १२ एप्रिलला तो रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास कामावरून सुटल्यानंतर त्याने घरी जाण्यासाठी घणसोली रेल्वेस्थानकातून ८.२७ ची ठाणे लोकल पकडली होती. लोकलमध्ये गर्दी असल्याने गणेश लोकलच्या उजव्या बाजूच्या दरवाजात उभा राहून प्रवास करत होता. लोकल रबाळे आणि ऐरोली रेल्वेस्थानकादरम्यान आली असताना, ऐरोलीजवळ अज्ञात व्यक्तीने लोकलवर दगड भिरकावला. तो दगड गणेशच्या डोळ्याखाली लागल्याने तो जखमी होऊन रक्तबंबाळ झाला. या वेळी गणेशने तत्काळ स्वतःला सावरले अन्यथा तो धावत्या लोकलमधून खाली पडला असता.
-------------
गुन्हा वाशी पोलिसांकडे वर्ग
घडलेल्या प्रकारानंतर लोकलमधील सहप्रवाशांनी गणेशला ऐरोली रेल्वेस्थानकात उतरवून त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर गणेशने ऐरोलीतील खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दगडफेकीची घटना ही वाशी रेल्वे पोलिसांच्या हद्दीत ऐरोली येथे घडली असल्याने ठाणे रेल्वे पोलिसांनी सोमवारी हा गुन्हा पुढील तपासासाठी वाशी रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला आहे. त्यानुसार वाशी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blood Donation Rules: 'हे' लोक रक्तदान करू शकत नाहीत, निर्बंध का? सर्वोच्च न्यायालयात सरकारचा खुलासा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Pune News: रुग्णालयांच्या अवाजवी बिलांना आता बसणार चाप; आरोग्यमंत्र्यांकडून ‘स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल’ची महत्त्वपूर्ण घोषणा..

ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, एनर्जी इतकी की तरुणांना सुद्धा लाजवेल, Viral Video

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

SCROLL FOR NEXT