ठाण्यात आगीच्या घटनांचे सत्र
तीन महिन्यांत ३०३ ठिकाणांवर दुर्घटना
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : गेल्या काही महिन्यांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे उष्णतादेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत असताना, दुसरीकडे ठाणे शहरात वर्षभरात आगीच्या ३०३ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांत २२५ घटना घडल्या आहेत.
ठाणे शहरात गेल्या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च तसेच एप्रिल या चार महिन्यांत तब्बल ३७६ घटनांची नोंद झाली होती. तसेच वर्षाअखेरीस एक हजार ८१६ इतक्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. तर मुंब्रा आणि गायमुख येथील घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. २०२५ हे वर्ष सुरू होताच ठाणे शहरात आगीच्या घटना कमी होण्यापेक्षा वाढताना दिसून आल्या आहेत. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत तब्बल ३०३ घटनांची नोंद झाली. जानेवारी महिन्यात लागलेल्या एका आगीच्या घटनेत एका मांजराचा गुदमरून मृत्यू झाला आहे, तर ३०३ घटनांपैकी काही घटनांमध्ये सुमारे ५०० हून अधिक जणांचे प्राण ठाणे अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांनी वाचवल्याची माहिती महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
...............................
आगीच्या घटनांचा तक्ता
वर्ष २०२४/ २०२५
जानेवारी ६७ / ०७८
फेब्रुवारी ११५ / १०६
मार्च ९५/ ११९
एकूण २७७/ ३०३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.