मुंबई

शिक्षक-पदवीधर सिनेटचे आंदोलन काढले मोडीत

CD

शिक्षक-पदवीधर सिनेटचे आंदोलन काढले मोडीत
पोलिसी बळाचा वापर केल्याने संताप
मुंबई, ता. १५ : नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय सिनेट सभेनंतर विद्यापीठ प्रशासनाने शिक्षक आणि पदवीधर सिनेट सदस्यांचे म्हणणेच ऐकूण घेण्याची मानसिकता ठेवली नसल्याचे सांगत आज (ता. १५) विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि पदवीधर सिनेट सदस्यांनी फोर्ट संकुलासमोर जोरदार आंदोलन केले. आंदोलनकर्त्या सिनेट सदस्यांसोबत प्राध्यापकांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेऊन आझाद मैदान पोलिस ठाण्यात नेऊन त्यांची सुटका केली.
व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सदस्यांकडून ऐनवेळी काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावर प्रशासनाने ऐकूण घेतले नसल्याने याविरोधात ‍शिक्षक आणि पदवीधर सिनेट सदस्यांसोबत बुक्टो आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फोर्ट संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन छेडले. विद्यापीठातील विविध प्रश्नांवर बॅनर झळकवत आणि घोषणाबाजी करताच विद्यापीठ प्रशासनाने पोलिसी बळाचा वापर करून आमचे हे आंदोलन मोडीत काढल्याचा आरोप आंदोलनकर्त्या सिनेट सदस्यांसोबत बुक्टो आणि युवासेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केला. त्‍यामुळे आम्हाला पोलिसांच्या मदतीने आझाद मैदानात घेऊन गेले, यात अनेक वरिष्ठ प्राध्यापकांनाही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले असल्याचे बुक्टोंकडून सांगण्यात आले.
काही दिवसांपूर्वीच एका विद्यार्थी संघटनेने असेच आंदोलन केले असताना ते आंदोलन मोडीत काढले गेले नाही अथवा पोलिसी बळाचाही वापर करण्यात आला नाही, परंतु आमचे आंदोलन मोडीत काढून विद्यापीठ प्रशासनाने दुजाभाव केल्याचा आरोप सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केला.
या धरणे आंदोलनात युवासेनेचे सिनेट सदस्य शशिकांत झोरे, अल्पेश भोईर, किसन सावंत आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता, तर बुक्टू या संघटनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. तप्ती मुखोपाध्याय, प्रा. मधू परांजपे, प्रा. शांती पोलिमोरी, अनुपमा सावंत, ज्योती पेटकर, स्वाती लावंड, डॉ. चंद्रशेखर कुळकर्णी, डॉ. जितेंद्रनाथ झा, प्रा. डॉ. हनुमंत सुतार, सखाराम डाखोरे, डॉ. सोमनाथ कदम, ताहीर मोहम्मद,उत्तम यादव, शरद त्रिपाठी आदी प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT