उंब्रजमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा
जुन्नर, ता. १५ : उंब्रज नंबर-२ येथे श्री हनुमान व श्री शनैश्वर आणि पावशादेव प्राणप्रतिष्ठा सोहळा ओतूर येथे नुकताच पार पडला. या वेळी ग्रामीण भागाने धार्मिकता जपली असल्याचे मत बाजीरावशेठ दांगट यांनी व्यक्त केले.
श्री हनुमान व श्री शनैश्वर आणि पावशादेव प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या वेळी शुक्रवारी (ता. ११) सकाळी मांडवडहाळे, कलश व मूर्ती मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर विविध धार्मिक सोहळे पार पडले. शनिवारी (ता. १२) देहू येथील गाथा मंदिराचे केशव महाराज हगवणे यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात आले. या वेळी उद्योजक बाजीरावशेठ दांगट, रंजना दांगट, जुन्नरचे माजी आमदार बाळासाहेब दांगट, मंदा दांगट, बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे, मा. जि. प. सदस्य मोहित ढमाले, ओतूरचे उपसरपंच प्रशांत डुंबरे, ह.भ.प. धोंडीबाऊ पानसरे, आधार पतसंस्थेचे अध्यक्ष भरत दांगट, मुंबईचे अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवाजीराव दावभट, शिवाजीराव निलख, वित्त मंत्रालयाच्या तनुजा सदाकाळ, माजी सरपंच खंडुशेठ चौधरी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष कैलास हांडे, उद्योजक गणेश होडे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक विलासशेठ दांगट, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन जालिंदर शेवाळे, खरेदी विक्री संघाचे संजय हांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या सर्व कार्यक्रमाचे नियोजन जय श्री हनुमान सामाजिक सेवाभावी संस्था, उंब्रज नं. १ व २, श्री महालक्ष्मी व मळगंगा देवस्थान धर्मदाय ट्रस्ट, उंब्रज नं. २, ग्रामपंचायत उंब्रज नं. २, आधार सहकारी पतपेढी, ग्रामविकास मंडळ व विविध संस्था तसेच महिला बचत गट, महिला ग्रामसभा, शेतकरी बचत गट व समस्त ग्रामस्थ उंब्रज नं.१ व २ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गणेश मोढवे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.