रोजगार मेळाव्यातून लाखोंचे पॅकेज
पनवेल महापालिकेचा पुढाकार; दिव्यांग उमेदवारांचीदेखील निवड
पनवेल, ता. १५ (बातमीदार) ः नुकतेच पनवेल महापालिकेच्या वतीने आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयामध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोजगार मेळाव्यातून निवडलेल्या उमेदवारांना चक्क लाखो रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. तर विशेष बाब म्हणजे विविध उमेदवारांमध्ये दोन दिव्यांग उमेदवारांचीदेखील निवड झाली आहे. यातील एका उमेदवाराला पुढील फेरीसाठी नियुक्ती करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात एकूण तीन हजार ५५१ उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी एकुण ८७२ उमेदवार विविध कंपन्यामध्ये नियुक्ती झाले. यामधील दुसऱ्या फेरीसाठी २०५ उमेदवारांची निवड झाली. अशा भव्य दिव्य स्वरूपात महापालिकेने प्रथमत:च रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. भविष्यात पनवेल हे एक आर्थिक घडामोडींचे मोठे केंद्र होणार आहे. यादृष्टीने विविध क्षेत्रात रोजगार निमिर्ती होणार आहे. यामध्ये पनवेल महापालिकेचे मोठे योगदान राहणार आहे. या पार्श्वभुमीवर महापालिकेने आयोजित केलेला हा रोजगार मेळावा उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने टाकलेले पाऊल असल्याचे वक्तव्य यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. यावेळी आयुक्तांनी रोजगार मेळाव्यासाठी आलेल्या उमेदवारांनी अत्यंत विश्वासाने व धैर्याने मुलाखतीस सामोरे जाऊन नोकरी मिळवावी असा सल्ला दिला. शासनाने दिलेल्या १०० दिवसीय कृती आराखड्यांतर्गत सात कलमी कार्यक्रमांवर आधारित नियोजित केलेल्या, या रोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
................
२१३ उमेदवारांना तत्क्षणी नियुक्ती
या रोजगार मेळाव्यात २१३ उमेदवारांना तत्क्षणी नियुक्ती पत्र देण्यात आले. या मेळाव्यात दोन लाख ८३ हजाराचे सर्वाधिक पॅकेज प्रतिवर्ष देण्यात आले. यावेळी एमबीए, बीई, फायनान्स, डिप्लोमा, दहावी-बारावी इत्यादी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी सहभाग घेतला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.