बेस्ट कर्मचाऱ्यांची
देणी एकरकमी द्या!
मुंबई, ता. १५ ः बेस्ट उपक्रमातील निवृत्त अधिकारी, कामगार यांना देय असलेले उपदान, अंतिम देयके, थकबाकीची रक्कम एसटी कर्मचाऱ्यांप्रमाणे एकरकमी देण्यासाछी मुंबई महापालिकेला आदेश द्या, असे साकडे बेस्ट जागृत कामगार संघटनेने नगरविकास मंत्र्यांना घातले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना देय असणारे मासिक वेतन त्वरीत देण्यासाठी राज्य शासनाने एसटी महामंडळाला निधी दिला. त्याच धर्तीवर बेस्टमधील सेवानिवृत्त अधिकारी, कामगारांना देय असणारी उपदा, अंतिम देयके, थकबाकीची रक्कम देण्यासाठी बेस्ट उपक्रमास त्वरीत निधी द्यावा, अशी मागणी बेस्ट जागृत कामगार संघटनेचे सरचिटणीस आणि बेस्ट उपक्रमाचे माजी सहाय्यक महाव्यवस्थापक सुहास नलावडे यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.