मुंबई

‘एआय’मुळे जाणार सहा वर्षात ६६ टक्के नोकऱ्या : अविनाश धर्माधिकारी

CD

‘एआय’मुळे जाणार सहा वर्षांत ६६ टक्के नोकऱ्या : अविनाश धर्माधिकारी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : ‘एआयचा (कृत्रिम बुद्धिमता) कालखंड सुरू झाला आहे. जगामध्ये एआयमुळे २०२७ पर्यंत आठ कोटी ७० लाख नोकऱ्या जाणार आहेत. याचा पहिला टप्पा म्हणून पुढील सहा वर्षांमध्ये ६६ टक्के नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे युवकांनी हे बदल समजून घेत परिस्थितीला सामोरे जावे,’ असे आवाहन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले आहे.
विद्या प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. वा. ना. बेडेकर यांच्या २१व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात सोमवारी (ता. १४) धर्माधिकारी यांनी ‘बदलता काळ आणि युवक’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी एआयच्या सुरू असलेल्या काळाबद्दल माहिती दिली. तसेच युवकांना बदलाचे नेतृत्व करता यायला हवे, असे सांगत या वेळी त्यांनी विचार आणि आचारांची त्रिसूत्री याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की २०३० पर्यंतचा कालखंड हा एकाच वेळी वेदनेचा आणि नवनिर्मितीचा असणार आहे. वेगाने होणारे हे बदल समजून घेत आत्मसात करून त्याला युवकांनी सामोरे जायला हवे. स्वत:ला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात प्रतिभावंत व्हावे, हे सूत्र युवकांनी अवलंबावे, असे ते म्हणाले. यात स्वत:ची ओळख, आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्राची निवड करणे आणि निवड केलेल्या क्षेत्रात उत्तम असून, प्रतिभावंत असणे गरजेचे असल्याचे धर्माधिकारी म्हणाले.

आचारांची त्रिसूत्री महत्त्वाची
‘आचारांची त्रिसूत्री महत्त्वाची आहे. ती म्हणजे नियमित योग करणे, स्वाध्याय - समोर येणारा कोणताही विषय स्वत: अभ्यास करणे आणि कार्यसंस्कृती - हाती घेतलेले कोणतेही काम उत्तम करणे ही त्रिसूत्री तरुणांनी अंगीकारायला हवी,’ असे मत अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास युवापिढीचा आणि भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल असेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Munde Case: ''वाल्मिक कराडच्या बंगल्यातून अजूनही सूत्र हलतात, धनंजय मुंडेंचा संबंध नाही'', ज्ञानेश्वरी मुंडेंनी स्पष्ट सांगून टाकलं

रोहित शर्मा, राहुल द्रविड यांच्या शैलीचं क्रिकेट T20 World Cup 2026 मध्ये चालणार नव्हते... सूर्यकुमार यादवचे स्पष्ट मत

Stock Market Today: शेअर बाजार लाल रंगात बंद! मोठी घसरण झाली तरी हे स्टॉक मात्र वाढले

इराण-इस्रायल तणावात सोन्याच्या किमती घसरल्या; खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे का? तज्ञांनी उत्तर देत गुंतवणूकदारांचा प्रश्नच सोडवला!

काही महिने सोबत राहिले पण... हंसिका मोटवानीचा घटस्फोट कशामुळे झाला? खरं कारण समोर

SCROLL FOR NEXT