उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला
उल्हासनगर, ता. १५ (वार्ताहर) : शहराच्या गजबजलेल्या कॅम्प-५ परिसरात मंगळवारी (ता. १५) सायंकाळी अट्टम प्रकाश अपार्टमेंटमधील स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे.
कॅम्प-५ मधील पूज्य चालीया साहेब मंदिराच्या शेजारी १९९५च्या सुमारास बांधण्यात आलेल्या अट्टम प्रकाश अपार्टमेंट या इमारतीत मंगळवारी सायंकाळी अचानक स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत राजकुमार डिसुजा हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महापालिकेचा अग्निशमन विभाग आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बचावकार्य तातडीने सुरू करून इमारतीत कोणी अडकले नसल्याची खात्री केली. या अपार्टमेंटची अवस्था जीर्ण झालेली असून, यापूर्वीदेखील काही वेळा रहिवाशांनी बांधकामाच्या सुरक्षेबाबत तक्रारी केल्या होत्या, अशी माहिती शेजारील नागरिकांनी दिली. दरम्यान, इमारतीची संरचना आणि स्थिरतेबाबत तपासणी सुरू करण्यात आली असून, पालिकेच्या अभियंत्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी सुरू केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.