मुंबई

भरधाव ट्रकच्या धडकेत बापलेक जखमी

CD

भरधाव ट्रकच्या धडकेत बापलेक जखमी

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ : कल्याण येथील दुर्गाडी चौकात शुक्रवारी (ता. १८) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील बापलेक गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मनोहर शिवराम तांबे (वय ५७) आणि प्रज्ञा मनोहर तांबे (वय २६) अशी जखमींची नावे आहेत. या अपघातप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबे हे भिवंडी येथे राहणारे असून नोकरीनिमित्त ते दररोज कल्याणला येतात. शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे दुचाकीवरून कामावर जात होते. कल्याण दुर्गाडी चौकात भरधाव वेगात आलेल्या एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकच्या चाकाखाली आल्याने बाप-लेकीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्परता दाखवत दोघांनाही तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताची माहिती मिळताच कल्याण शहर वाहतूक पोलिस आणि बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रकचालकाला ताब्यात घेतले. या अपघातामुळे काही काळ दुर्गाडी परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: स्कूल बसचालकाचा निष्काळजीपणा! बीडमध्ये अपघात; रस्ता ओलांडताना विद्यार्थिनीला दुचाकीची जोराची धडक, मुलगी जखमी

Mumbai News : पर्यटनस्थळाचा प्रचार हा एकमेव उद्देश; असुरक्षित कृतींना कोणतेही प्रोत्साहन नाही – पर्यटन विभाग

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

SCROLL FOR NEXT