मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोघांचा मृत्यू
कासा, ता. १८ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शुक्रवारी (ता. १८) दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये एका १४ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शुक्रवारी (ता. १८) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीने पुढे जाणाऱ्या ट्रकला धडक दिली. या धडकेत दुचाकीचालक राहुल गोरवाला (वय २०) याचा मृत्यू झाला, तर पाठीमागे बसलेला रोशन माळी (वय २४) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात चारोटी अल्फा हॉटेलसमोर घडला. राहुल व रोशन हे दोघे दुचाकीने गुजरातकडून मुंबईच्या दिशेने जात असताना अल्फा हॉटेलसमोर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व त्याची दुचाकी समोरील ट्रकला धडकली. यामध्ये दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र यामध्ये राहुल गोरवाला यांच्या मृत्यू झाला, तर जखमीवर उपचार सुरू आहेत. दुसऱ्या घटनेत तवा आश्रमशाळेसमोर भरधाव वेगात असलेल्या कारचा अपघात होऊन एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात जोहन जैसन थोमस (वय १४) याचा मृत्यू झाला असून, त्याची बहीण जिया जैसन थोमस (वय १८) व वडील जैसन टी. यू. थोमस (वय ४८) हे किरकोळ जखमी झाले आहेत. यामध्ये फिर्यादी कुरीया केटी थोमस (वय ४७) यांच्या तक्रारीनुसार त्याच्या कारवरील नियंत्रण सुटले व या कारने पुढील वाहनास धडक दिली. यामुळे त्यांची कार रस्त्यावर उलटली व यात त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. ते मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.