प्रतिबंधित भागात ड्रोन; अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल
पनवेल, ता. १८ (वार्ताहर) : पनवेलमधील प्रतिबंधित असलेल्या ओएनजीसी फेज २ मधील प्रोसेस लॅबच्या मागील बाजूस एका अज्ञात व्यक्तीने विनापरवाना ड्रोन कॅमेरा उडविल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात विनापरवाना ड्रोन कॅमेरा उडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
१६ एप्रिल रोजी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पनवेलमधील प्रतिबंधित असलेल्या ओएनजीसी फेज २ मधील प्रोसेस लॅबच्या मागील बाजूस ड्रोन कॅमेरा उडविण्यात आल्याचे आढळून आले. अज्ञात व्यक्तीने ड्रोन कॅमेरा उडविण्याची कोणतीही परवानगी न घेता, विनापरवाना ओएनजीसी परिसरात हवेत ड्रोन कॅमेरा उडवून विशेष शाखेचे पोलिस उपआयुक्त यांनी जारी केलेल्या आदेशाचा भंग केला. त्यामुळे पनवेल शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २२३ सह म.पो.का. कलम १३४, १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.