मुंबई

पुगाव-पुईदरम्‍यान कालव्यावरील पूल कोसळला

CD

रोहा, ता. २६ (बातमीदार) ः कोलाड पाटबंधारे विभागाकडून पुगाव-पुई आदिवासीवाडीकडे जाण्यासाठी कालव्यावर पूल बांधण्यात आला आहे. यावरून बकऱ्या जात असताना गुरुवारी (ता. २४) अचानक पूल कोसळल्‍याने बकऱ्या कालव्यात पडल्‍या. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्‍थांनी घटनास्‍थळी धाव घेत कालव्यात उड्या मारून बकऱ्यांना वाचवले. दुसरीकडे पूल कोसळल्याने रहदारीचा रस्ता बंद झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
कोलाड पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या उजवा तीर कालव्यावरील पूल गुरुवारी दुपारी अचानक पडला. या वेळी पुलावरून २० ते २५ बकऱ्या जात होत्या. पूल पडल्याने सगळ्या बकऱ्या कालव्याच्या पाण्यात वाहत जात होत्‍या. हे दृश्य पाहताच बकऱ्यांचा मालक आणि ग्रामस्थांनी पाण्यात उड्या मारून बकऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. आदिवासीवाडीतील शेकडो ग्रामस्‍थांची याच पुलावरून वर्दळ सुरू असते. शाळा-महाविद्यालयीन मुले, कामगार याच पुलावरून ये-जा करतात. पुलाअभावी शाळकरी मुले, तसेच गर्भवती महिलांना दवाखान्यात त्याचप्रमाणे बाजारहाटासाठी जाणाऱ्यांचे हाल होत आहेत.
गावातून बाजारात येण्यासाठी अन्य मार्ग नसल्याने पाटबंधारे विभागाने तातडीने नवीन पुलाचे बांधकाम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. घटनेची माहिती पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पुलाअभावी नागरिकांची होणारी गैरसोय लवकरच दूर करण्यात येईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. या वेळी पुई ग्रामपंचायत माजी सरपंच संजय मांडळुस्कर, सुनील दळवी, पुगाव ग्रामपंचायत माजी सदस्य सुधीर शेळके, आदिवासीवाडीवरील वसंत कोळी, राम वाघमारे, अनिल वाघमारे, संतोष वाघमारे, विजय जाधव, रामू कोळी, परशुराम जाधव, सीताराम जाधव, ज्ञानेश्वर कोळी, सुनील जाधव, राजेश जाधव, चंद्रकांत जाधव, संतोष जाधव, अनिल वाळेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

रोहा ः कालव्यावरील पूल कोसळल्‍याने ग्रामस्‍थांचा रहदारीचा मार्ग बंद झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attacked : पश्चिम बंगालमध्ये खळबळ! TMC खासदार अभिषेक बॅनर्जींवर थेट जमावाकडून हल्ला; 'चोर चोर'च्या घोषणा देत बेदम मारहाण, अंडी-दगडंही फेकली

Mumbai Crime: पुण्यातील विषारी दारुचे धागेदोरे भिवंडीत, तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; नेमकं काय घडलं?

IPL फायनलपूर्वी RCB चाहत्यांना मोठा धक्का! सेलिब्रेशनवर पोलिसांकडून बंदी; मोठी अ‍ॅडव्हायजरी जारी

Relationship Tips : जोडीदाराने नेहमी तुम्हाला जास्त प्रायोरिटी द्यावी असं वाटतं ना? मग नात्यात अजिबात करू नका 'या' 3 चुका

Mumbai: मुंबईकरांना मोठा दिलासा! मेट्रो, मोनोरेल आणि लोकल रेल्वेचा संगम... 'हे' स्टेशन वन-स्टॉप कनेक्टिव्हिटी हब बनणार

SCROLL FOR NEXT