मुंबई

तरणतलाव मृत्यूप्रकरणी चौकशी समिती

CD

भाईंदर, ता. २६ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या क्रीडासंकुलातील तरण तलावात ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी महापालिका आयुक्तांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे. या समितीला अहवाल सात दिवसांत सादर करायचा आहे. त्यानंतर आयुक्त निर्णय घेणार आहेत.

भाईंदर पूर्व येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे क्रीडासंकुलातील तरण तलावात ग्रंथ मुथा याचा मृत्यू झाला होता. यावरून शहरात संतापाचे वातावरण आहे. क्रीडासंकुलाच्या संचालनासाठी महापालिकेने कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे; परंतु कंत्राटदाराने बेकायदा उपकंत्राटदाराची नियुक्ती केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे मुलाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटदारसह उपकंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच क्रीडासंकुलाचे कंत्राटही रद्द करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. ग्रंथचे वडील हसमुख मुथा व अन्य कुटुंबीयांनी नुकतीच आयुक्त राधाबिनोद शर्मा यांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी केली. या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयुक्तांनी समिती स्थापित केली आहे.

अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, शहर अभियंता दीपक खांबित, तसेच समाजविकास अधिकारी दीपाली पवार यांचा या समितीत समावेश आहे. तरण तलावाचा आकार काय होता, मुलांना प्रशिक्षण दिले जात असलेल्या ठिकाणी खोली किती होती, प्रशिक्षित व अनुभवी प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती का, जीवरक्षक पुरेशा प्रमाणात होते का, मुख्य कंत्राटदारने उपकंत्राटदाराची नियुक्ती केली होती का, अशा विविध मुद्द्यांवर ही समिती चौकशी करणार आहे, तसेच या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजचाही अभ्यास समिती करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG दरवाढीचा नवा धक्का! गेल्या ११ दिवसांतील ही चौथी वाढ... मुंबई-पुण्यात दर किती?

'तो संपूर्ण रात्र दुसऱ्या महिलेसोबत राहिला तरी...' तबिंदा सनपाल नवऱ्याबद्दल बोलताना म्हणाली...'तो दर दिवाळीत तीन किलो सोनं देतो'

Chandgad Drowning Child : आजीच्या निधनामुळे गावी गेल्या अन् तीन शाळकरी मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू, चंदगडमधील घटना; लहान भावाचे प्रयत्न असफल...

Buldhana Tragedy: पत्नीशी वादानंतर टोकाचे पाऊल! चार चिमुकल्यांना विहिरीत ढकलून पित्याने जीवन संपवले, बुलडाण्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना

Maharashtra Accident: सोमवार ठरला ‘अपघातवार’; एकच दिवशी १४ जणांचा मृत्यू, आंबेनळीत मोटार कोसळून आठ तर तिहेरी अपघातात सहा जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT