सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : ठाणे शहरात कचराकोंडीचे विदारक चित्र आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना आखण्यात येत असून कचऱ्यापासून मुक्तीसाठी पर्यायी व्यवस्था, लोकसंवाद आणि दंडात्मक कारवाईची त्रिसूत्री राबवण्यात येणार आहे.
ठाणे पालिका क्षेत्रात काही दिवसांपासून कचराप्रश्न चांगलाच पेटला होता. शहरातील विविध भागात रस्त्यावर कचरा साचल्याने दुर्गंधी व आजाराला निमंत्रण मिळत होते. त्यामुळे ठाणे पालिका प्रशासनाने कचराप्रश्न मार्गी लावण्यासाठी हस्तांतरण केंद्र सुरू केली होती; मात्र त्याला विरोध झाल्याने शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर, चौकात, रस्त्याच्या कडेला कचरा, गृहसंकुलांच्या बाहेर, बांधकामातील शिल्लक साहित्य, डेब्रिज, मोडके फर्निचर टाकले जात असल्याचे चित्र होते. या ढिगाऱ्यांमुळे शहराला बकाल रूप आले आहे. तर रहदारीलादेखील आडकाठी निर्माण होत होती. याच अनुषंगाने नुकतीच आयुक्त कार्यालयात याबाबत बैठक घेण्यात आली. या वेळी प्रभागातील कचरा टाकण्याची ठिकाणे शोधून काढावीत. तसेच नागरिकांना पर्यायी जागा सूचवताना त्यांच्याशी संवाद साधण्याचे निर्देश महापालिका आयुक्त राव यांनी दिले आहेत.
.................................
प्रभात मोहीम नियमितपणे राबवा
परिमंडळ उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता यांनी आठवड्यातून दोन दिवस आपापल्या क्षेत्रात सकाळी फेरी मारावी. सकाळी चालणाऱ्या लोकांशी संवाद साधावा. तसेच, साफसफाई, डेब्रिज आदींची पाहणी करून स्वच्छतेचा नियमित आढावा घ्यावा.
...........................................
...अन्यथा दंडात्मक कारवाई
स्थानिकांमध्ये स्वच्छतेविषयी सजग असलेल्यांची फळी तयार करावी. त्यांच्या माध्यमातून लोकसंवाद साधल्यास कचरा टाकण्यास प्रतिबंध होईल. त्यातूनही काही बदल झाला नाही तर दंडात्मक कारवाईचा पर्याय राहील, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.