वज्रेश्वरी, ता. २६ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वज्रेश्वरी योगिनी देवीचा यात्रा उत्सव सोहळा शनिवार (ता. २६)पासून सुरू झाला आहे. यानिमित्ताने होणारे विविध धार्मिक सोहळे भाविकांसाठी मुख्य आकर्षण आहे.
ठाणे, मुंबई, नाशिक, रायगडबरोबर गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. येणाऱ्या भाविकांसाठी गणेशपुरी पोलिसांनी अधिक बंदोबस्त मंदिर आणि यात्रा भागात तैनात करण्यात येणार असल्याचे गणेशपुरी पोलिस निरीक्षक संदीपन सोनावणे यांनी सांगितले. मंदिरासमोरील मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच सर्व वाहतूक बाह्यवळण मार्गाने वळवण्यात आली आहे. यात्रा परिसरात मोठ्या प्रमाणात मिठाई, खेळ याबरोबर संसारोपयोगी, शेती उपयोगी साहित्यांबरोबर मनोरंजनासाठी आकाश पाळणे लावण्यात आले आहेत. भाविकांसाठी वसई, विरार, भिवंडी, ठाणे येथून एसटीच्या बसची सुविधा ठेवण्यात आली आहे. तर वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थानतर्फे भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.