ठाणे : महापालिकेतर्फे २२ एप्रिल ते १ मे या काळात वसुंधरा सप्ताह साजरा केला जात आहे. त्याअंतर्गत, शुक्रवारी ब्रम्हाळा तलाव येथे जनजागृतीपर उपक्रम करण्यात आले. त्यात पर्यावरणपूरक संवर्धनासाठी ब्रम्हाळा तलाव येथे तरंगत्या पाणथळ पट्ट्या (फ्लोटिंग वेटलँड्स) बसवण्यात आल्या. ठाणे महापालिका आणि कोलगेट कंपनीच्या सीएसआर निधीतून हा उपक्रम राबवण्यात आला असून भगीरथ व गुडेरा संस्थांचे सहकार्य लाभले आहे. या उपक्रमासाठी पर्यावरण विभागाच्या प्रमुख मनीषा प्रधान, ओम परळकर, प्रभाकर सोनावले यांनी मार्गदर्शन केले. यानिमित्ताने पाणथळ पट्ट्या तलावात सोडण्यात आल्या. माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी भेट दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.