अंबरनाथ, ता. २६ (वार्ताहर) : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या वतीने बंदची हाक पुकारण्यात आली आहे. सोमवारी (ता. २८) बंद पुकारला असून, नागरिकांना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण अंबरनाथमध्ये एक दिवस कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी पर्यटक सुट्टीचा आनंद घेत असताना दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करत पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. यामध्ये २६ जणांनी प्राण गमावले, तर अनेक जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून पुरुषांवर गोळीबार केल्याचा धक्कादायक खुलासा प्रत्यक्षदर्शींनी केला. पर्यटकांना कलमाही वाचायला लावला. या संपूर्ण घटनेने देशाला हादरून टाकले आहे. याचे पडसाद जगभर उमटले. या घटनेचा महाराष्ट्रातही तीव्र निषेध केला जात आहे. अनेक ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे जाळून, पायदळी तुडवून निषेध व्यक्त होत आहे. दरम्यान, अंबरनाथमध्ये या हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंदची हाक काँग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा पाटील, सरचिटणीस नंदकुमार देवडे, सरचिटणीस रोहित कुमार प्रजापती यांनी सोमवारी अंबरनाथ बंद ठेवण्याचे नागरिकांना आवाहन केले. यावेळी अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार असल्याची माहिती सरचिटणीस रोहित प्रजापती यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.