मुंबई

अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा ‘शॉक’

CD

पनवेल, ता. २६ (बातमीदार) : जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर, घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल, शिक्षण व आरोग्यावरील खर्च आदींमुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडलेले आहे. अशातच महावितरणकडून नियमित वीज बिलासह अतिरिक्त सुरक्षा ठेव, अशी दोन बिले मिळाल्याने ग्राहकांना ‘शॉक’ बसला आहे. नवी मुंबई, पनवेल आणि उरण विभागात महावितरणचे सुमारे २० लाख ग्राहक आहेत. त्या सर्व ग्राहकांना अतिरिक्त बिलाचा फटका बसला आहे.
महावितरणने नियामक आयोगाकडे मागितलेली वीजदरवाढ तुर्तास टळली अन्यथा एप्रिल महिन्यातच ती लागू झाली असती. यात सामान्य ग्राहक वाचला असला तरी एप्रिल महिन्यात नियमित वीज बिलासह अतिरिक्त सुरक्षा ठेव, अशी दोन बिले मिळाल्याने ग्राहकांना ‘शॉक’ बसला आहे. नियमित वीज बिल भरणाऱ्या सामान्य घरगुती ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव आम्ही का भरायची? असा सवाल पडला आहे. महावितरण अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या नावावर पुन्हा ग्राहकांकडून पैसे ओरबाडण्याचा प्रकार करीत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. यापूर्वी सुरक्षा ठेवीची रक्कम एका महिन्याच्या बिलाइतकी होती; मात्र नवीन नियमांनुसार एप्रिल २०२२पासून दुप्पट म्हणजे दोन महिन्यांच्या बिलाइतकी करण्यात आली आहे. ग्राहकांना ४०० ते ५०० रुपयापर्यंत येणारे वीज बिल आता ते एक हजार ते एक हजार २०० रुपयांपर्यंत गेले आहे. वीज बिल जास्त येत असल्याच्या तक्रारी सामान्य घरगुती ग्राहकांच्या नेहमीच्याच झाल्या आहेत. असे असतानाही महावितरण ग्राहकांवर आर्थिक ओझे लादण्याचा प्रकार करीत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
--------------
अतिरिक्त सुरक्षा ठेवीची गरज काय?
वीज बिलाचा कमी वापर असलेल्या ग्राहकांना एक हजार ३०० ते दोन हजार ५०० रुपयापर्यंत; तर काहींना यापेक्षाही जास्त अतिरिक्त सुरक्षा ठेवचे बिल मिळाले आहेत. जे ग्राहक नियमित वीज बिल भरतात, त्यांच्यासाठी सुरक्षा ठेवीची ही भानगड नको, असा संताप पनवेलमधील ग्राहकांनी व्यक्त केला आहे.
-----------
महावितरणचे म्हणणे
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता २०२१च्या कलम १३.१ नुसार, वीज ग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारली जाते. सुरक्ष ठेव नियमाने बंधनकारक आहे. दरवर्षी सुरक्षा ठेवची पुनर्गणना केली जाते. त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर नवीन रक्कम ग्राहकाच्या मागील एका वर्षातील सरासरी वीज वापराच्या आधारे निर्धारित केली जाते. ही अतिरिक्त सुरक्षा ठेव नियमानुसार असून त्याचा वीज ग्राहकांनी भरणा करावा.
---------------
महावितरणकडून जनतेची लूट सुरू आहे. मला सुरक्षा ठेवीच्या नावाखाली नियमित बिल सोडून अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून अतिरिक्त बिल आले आहे. वीज वितरण कंपनीचा हा भोंगळ कारभार सुरू आहे. वीज ग्राहकांना कोणीच वाली उरला नाही. आधीच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे.
- विजय घोगरे, वीजग्राहक, कळंबोली
--------------
सतत वाढत जाणाऱ्या विजेच्या बिले यामुळे वीजग्राहक हैराण झाले आहेत. वीज जोडणी घेताना सुरक्षा ठेव म्हणून काही रक्कम घेतली जाते. नंतर अतिरिक्त सुरक्षा ठेव कशी काय घेतली जाते, याविषयी वीजवितरण कंपनीच्या धोरणाबद्दल ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
- नितीन काळे, वीजग्राहक, कळंबोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT