नेरूळ, ता. २६ (बातमीदार) : वाढत्या उन्हाचा माणसाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. सध्या तापमानाचा पारा वाढल्याने दिवसभर उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. अशावेळी शरीर संतुलित ठेवण्यासाठी आहारावरही विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. उन्हामुळे भूक मंदावणे, डिहायड्रेशन, उष्माघात, ऍसिडिटी, डोकेदुखी, अस्वस्थ वाटणे, थकवा जाणवणे आदी समस्या उद्भवतात. त्यामुळे या ऋतूमध्ये मिळणारे फळे व त्यांचा रस पिणे महत्त्वाचे असल्याचे आहारतज्ज्ञ सांगत आहेत.
१. फणस - फणसातील अँटिऑक्सिडंटमुळे कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह आणि डोळ्यांच्या समस्या होण्यापासून रक्षण होते. फणस खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते, रक्तदाब नियंत्रित राहतो. फणसात असणाऱ्या फायबर्समुळे पोट साफ होण्यास मदत होते. अल्सरचा त्रास कमी होतो. सफरचंद, केळीपेक्षा फणसात अधिक जीवनसत्वे असतात. बाजारात फणसाची आयात कोकण, राजापूर तसेच कर्नाटक मधून घाऊक बाजारात आवक होत आहे.
२. कलिंगड - कलिंगडमध्ये क जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. कलिंगडमध्ये आढळणारे अ जीवनसत्त्व आणि बीटा-कॅरोटीनची पातळी त्वचा निरोगी ठेवते आणि केसांच्या वाढीस मदत करते. शरीरात कोणत्याही प्रकारची जळजळ असल्यास कलिंगड त्यापासून आराम देते. कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे शरीर हायड्रेट राहते.
३. टरबूज - टरबूज खायला भरपूर रसाळ असल्यामुळे तो खाण्याचा अनेकांना मोह होतो. टरबूज हा अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. यामध्ये क आण अ जीवनसत्त्व, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. टरबूजमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि त्वचेचे आरोग्य देखील सुधारते.
४. जांभूळ - अनेक गुणांनी परिपूर्ण असणारे हे फळ आहे. याचा वापर शरीराला बाहेरून आणि अंतर्गत दोन्ही प्रकारे शुद्ध करण्यासाठी केला जाऊ शकतो. जांभळाची साल ही रक्त शुद्ध करणारी आहे. जांभूळ फक्त फळच नाही; तर त्याच्या झाडाची साल, पाने आणि बियाही खूप फायदेशीर आहेत. मोठ्यांसोबत लहान मुलांच्या आरोग्यासाठी जांभूळ फायदेशीर आहे.
६. ताडगोळे - ताडगोळे चवदार आणि शरीरासाठी अत्यंत गुणकारी असे समजले जातात. निसर्गतः थंड असलेल्या या ताडगोळ्यांमुळे शरीरातील उष्णता नियंत्रित राहण्यास मदत होते. ताडगोळ्यांच्या सेवनामुळे खनिज, लोह, पोटॅशियम आणि अ, ब, क ही जीवनसत्वे मिळतात. त्यामुळे हे फळ शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. सध्या बाजारात १०० रुपयांना आठ किंवा नऊ ताडगोळे मिळत आहेत.
८. आंबा - आंबा खाल्ल्याने रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते. पचनसंस्था निरोगी राहते. आंबा खाल्ल्याने ताण कमी होतो आणि नैराश्यासारख्या आजारातून बरे होण्यास मदत होते. आंबे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि सामान्य हृदयाचे ठोके राखण्यास मदत करते.
-----------
शरीराला डिहायड्रेट ठेवण्यासाठी पाणी, ताजी फळे व फळांचा रस सेवन करावा. विनाकारण उन्हात फिरणे टाळावे. मांसाहार, अतिप्रमाणात तिखट, तेलकट पदार्थ, बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ टाळावेत. उन्हाळ्यामधे हे पदार्थ पचायला जड जातात आणि त्यामुळे अॅसिडीटी होते. बाटलीबंद शीतपेये पिणे टाळावे. त्याऐवजी दही, ताक, सोलकढी प्यावे.
- डॉ. पौर्णिमा कचरे, आयुर्वेद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.