मुंबई

मागणीनंतर २४ तासांत टँकर पुरवठा करावा

CD

मागणीनंतर २४ तासांत टँकर पुरवठा करावा
जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे निर्देश

अलिबाग, ता. २६ (वार्ताहर) ः पिण्यासाठी पाणी हे आपले सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे जिल्ह्यात ज्या ठिकाणी टँकरची मागणी होईल, त्या ठिकाणी आवश्यक तपासणी करून २४ तासांच्या आत टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, टंचाईग्रस्त गावांत नागरिकांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाईविषयक आढावा बैठक गुरुवारी (ता.२४) घेण्यात आली. बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपजिल्हाधिकारी डॉ. रवींद्र शेळके यांसह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी दूरदृश्‍यप्रणालीद्वारे उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आढावा घेत, जिल्ह्यात कोणत्याही गाव, वाडी-वस्तीवर पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्यास त्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात यावा, असे जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले.
पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेला प्रशासनाकडून सर्वोच्च प्राधान्य आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई चालणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिथे पाणीपुरवठा योजना प्रलंबित आहेत, त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. पाणी साठा कमी झाला की, स्रोत दुषित होऊ शकतात. यामुळे साथीचे आजार उद्‌भवू शकतात, हे लक्षात घेऊन पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही ते तपासावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जलजीवन मिशनची कामे तातडीने पूर्ण करा तसेच जी कामे पूर्ण झाली आहेत त्या योजनातून तत्काळ पाणीपुरवठा सुरू करा. ज्या योजनेची वीज देयके थकीत असतील, त्या ठिकाणी वीज खंडित होणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, असेही जावळे यांनी सांगितले.

१०६ वाड्या, २१ गावांसाठी २५ टँकरद्वारे पाणीपुरवठा
शहरी भागासोबतच गाव, वाड्या-वस्त्यांवर पाणी पुरवठा करण्यासाठी विहिरी, विंधन विहिरींचे अधिग्रहण, नळ योजनांची दुरुस्ती, तात्पुरती नळ पाणी योजना, नवीन विंधन विहिरी, टँकरद्वारे पाणी पुरवठा आदी विविध बाबींचा समावेश असलेला पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात सध्या १०६ वाड्या आणि २१ गावांना २५ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच १७ विहिरी खोल करणे व गाळ काढण्यासाठी परवानगी देण्यात आल्‍याची माहिती जावळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT