मुंबई

शहर विद्रूपीकरणाला लगाम

CD

भिवंडी, ता.२६ (बातमीदार): भिवंडी शहराचे सौंदर्य बिघडवणाऱ्या ४८८ बेकायदा जाहिरात फलक तसेच ३५७ झेंडे काढून टाकण्यात आले आहेत. मात्र, या प्रकरणात पालिका प्रभाग अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भिवंडी महापालिका आयुक्त अनमोल सागर यांच्या निर्देशानुसार, महापालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत बॅनर, होर्डिंग्ज आणि जाहिरात फलक काढून टाकण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत २३ ते २५ एप्रिल दरम्यान तीन दिवसांत पाच विभागीय प्रभाग अधिकाऱ्यांनी शहरातील २७१ बॅनर, २१७ पोस्टर्स आणि विविध प्रकारचे ३५७ झेंडे काढून जप्त केले. पालिकेच्या सर्व विभागीय अधिकाऱ्यांनी तसेच बीट निरीक्षकांनी राबवली आहे.
--------------------------------------------
कायदेशीर कारवाई कधी?
शहरातील बेकायदा फलक काढण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तीन दिवस पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा वापर केला. पालिकेच्या वाहनांचा वापर केला. मात्र, शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर प्रभाग अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे प्रभाग अधिकारी आणि जाहिरात विभाग वेळीच कारवाई करीत नसल्याने पालिकेचे प्रचंड नुकसान होत असून विनापरवाना जाहिरातबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
-----------------------------------------------
शहराच्या सुशोभिकरणाचा भाग म्हणून अनधिकृत बॅनर आणि पोस्टर्स लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंधक कायदा, १९९१ अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल.
- अनमोल सागर, आयुक्त, भिवंडी महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price Hike : महागाईचा झटका ! एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या घरगुती आणि व्यावसायिक LPG चे ताजे दर

Singapore Open Win: आधी सलग ४ वेळा अपयश, पण सिंगापूर ओपनमध्ये भारतीय वाघांची थेट पहिल्या स्थानावर मुसंडी!

Ujani Temple: उजनीतील प्राचीन स्थापत्यकलेचा वारसा पुन्हा उजेडात; पाणी साठा घटल्याने पळसनाथ मंदिराचे दर्शन, पाच दशकांनंतरही सुस्थितीत

Maharashtra Weather: राज्यात पुढील दोन दिवस वादळी पाऊस, मेघगर्जना आणि गारपिटीचा इशारा; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात गावठी दारुच्या ५४ हातभट्ट्या, ४ वर्षांत दोन लाख लिटर दारु, ३० लाख रसायन लिटर नष्ट; गावागावांत हातभट्टीचा महापूर, वाचा...

SCROLL FOR NEXT