शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंची युथ आयकॉन म्हणून घोषणा
अलिबाग, ता. २६ (वार्ताहर) ः शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त जिल्ह्यातील सात खेळाडूंची युथ आयकॉन म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नुकतीच घोषणा केली. जिल्हाधिकारी कार्यालयात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा सत्कार जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) पुनिता गुरव, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत वाघ आदी उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, की धैर्य, शौर्य, संयम, प्रयत्न हे या रायगडच्या मातीचे गुण आहेत. या जिल्ह्यात प्रथमच एकाच वेळी सात खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ही बाब जिल्ह्यासाठी भूषणावह आहे. या सर्व खेळाडूंनी आपल्या खेळाच्या माध्यमातून जिल्हा आणि राज्याचाच नव्हे तर देशाचा लौकिक वाढविला पाहिजे. त्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करीत आहे. तसेच वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेते. त्याचा सर्वांनी लाभ घेऊन चांगली कामगिरी करावी, अशा शुभेच्छाही त्यांनी या वेळी दिल्या. या वेळी सुमा सिद्धार्थ शिरूर - पनवेल (पॅरा शूटिंग) यांना जिजामाता पुरस्कार, श्रेयस वैद्य - नागोठणे (जलतरण वॉटरपोलो), मानसी मोहिते - महाड (ट्रायथलॉन), धनंजय पांडे - महाड (रोइग), ऋषिकेश मालोरे - माणगाव (वुशू) (दिव्यांग), कोमल किरवे (जलतरण वॉटरपोलो), स्वस्तिक घोष यांना जिल्हाधिकारी जावळे यांच्याहस्ते प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत वाघ यांनी केले. आभारप्रदर्शन तालुका क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनूर यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.