मुंबई

कल्याणला वाहतूक कोंडीचे ग्रहण

CD

कल्याणला वाहतूक कोंडीचे ग्रहण
कल्याण वाहतूक उपविभागाचा बसचालकांवर कारवाईचा बडगा

कल्याण, ता. २६ (बातमीदार) : शहरातील पश्चिमेकडील मुरबाड रोड ते बाईचा पुतळा चौक आणि संतोषी माता रोडमार्गे सहजानंद चौक, शिवाजी चौक हे वाहतूक कोंडीचे मोठे हॉटस्पॉट ठरत आहेत. या भागात दररोज संध्याकाळी सहानंतर रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी होत आहे. या काळात इथून वाहन चालवताना अनेकांच्या अंगावर काटा यावा अशी स्थिती असते. याला कारण अंबरनाथ, उल्हासनगर येथून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या बस, केडीएमटी व एसटीच्या बस कारणीभूत आहेत. या बसवरच कल्याण वाहतूक उपविभागाने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

कल्याण पश्चिमेला रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या बस व अवजड वाहनांना प्रवेश करण्यासाठी बंदी आहे. या बसना प्रेम ऑटोमार्गे कल्याण दुर्गाडी इथे मार्गस्थ होण्याच्या सूचना कल्याण वाहतूक उपविभागाने काही दिवसांपूर्वीच दिल्या आहेत. तसेच एसटीच्या ठरावीक बस कल्याण एसटी आगाराजवळ येऊ शकतात; तरीदेखील बसमुळे वाहतूक कोंडी होताना दिसत आहे.

कल्याण पश्चिमेकडील वाहतूक नियंत्रण करण्याची जबाबदारी ही कल्याण वाहतूक उपविभागाकडे आहे. या वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक रामचंद्र मोहिते यांना विचारणा केली असता, आम्ही वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या बसचालकांवर कारवाई करणार आहोत. शिवाजी चौकात नुकतीच दोन बसचालकांवर कारवाई केली आहे. संतोषी माता रस्त्यावरील कोंडीवरही तोडगा काढू. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात मी स्वतः उभा राहून वाहतूक नियंत्रण करून रिक्षाचालकांना शिस्त लावत आहे, असे ते म्हणाले.

अर्ध्या तासाच्या रांगा
मुरबाड रोड व संतोषी माता रोड, सहजानंद चौक, शिवाजी चौक येथील रात्रीची वाहतूक कोंडी अद्याप कमी झालेली नाही. उलट त्यात वाढ झालेली आहे. मागील काही दिवस सलग संतोषी माता रोडवर एकाच ठिकाणी चालकांना अर्धा अर्धा तास अडकून पडावे लागते आहे. दोन दिवसांपासून या रस्त्यावर अशीच स्थिती असल्याचे इथून प्रवास करणाऱ्या एका वाहनचालकाने नमूद केले.

चालकांची मुजोरी
अंबरनाथ, उल्हासनगर इथून अनेक लांब पल्ल्याच्या खासगी बस या रात्रीच्या सुमारास शिर्डी, अहिल्यानगरच्या दिशेने निघतात. या वेळी कल्याणमधील दुर्गाडी इथे त्यांचा मुख्य थांबा असून, तिथून ते प्रवासी भरतात. मात्र अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण या प्रवासात ठिकठिकाणी थांबून या बस प्रवासी घेत असल्याचे यापूर्वीच दिसून आले आहे. या बस वारंवार थांबत असल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. त्यात संतोषी माता रोड हा छोटा रस्ता असल्याने इथे एकाच वेळी दोन-तीन बस एकत्र आल्या आणि इतर वाहनांची संख्या वाढली की सहजानंद चौक आणि रामदेव हॉटेलपर्यंत लांबच लांब रांगा लागतात. त्यात कर्णिक रोड, रामबाग लेनसारखे अंतर्गत रस्ते दुचाकीस्वार, रिक्षांनी भरून जातात. पर्यायाने मुरबाड रस्त्यावर बाईच्या पुतळ्यापर्यंत कोंडी होते.

वाहनचालकांनी तारतम्य बाळगून वाहने चालवावीत. जसा रस्त्यावर वाहन चालवण्याचा आपल्याला अधिकार आहे तसा तो रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांनाही आहे. जमेल तिथे वाहन घुसवणे किंवा पार्क करणे हा बेशिस्त कारभार आहे. बहुतांश वाहनचालक वाहतूक नियम धाब्यावर बसवण्याचा प्रयत्न करतात. अशा वाहनचालकांवर ठोस कारवाई केली जाईल.
- पंकज शिरसाठ, पोलिस उपायुक्त, कल्याण वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG दरवाढीचा नवा धक्का! गेल्या ११ दिवसांतील ही चौथी वाढ... मुंबई-पुण्यात दर किती?

'तो संपूर्ण रात्र दुसऱ्या महिलेसोबत राहिला तरी...' तबिंदा सनपाल नवऱ्याबद्दल बोलताना म्हणाली...'तो दर दिवाळीत तीन किलो सोनं देतो'

Chandgad Drowning Child : आजीच्या निधनामुळे गावी गेल्या अन् तीन शाळकरी मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू, चंदगडमधील घटना; लहान भावाचे प्रयत्न असफल...

Buldhana Tragedy: पत्नीशी वादानंतर टोकाचे पाऊल! चार चिमुकल्यांना विहिरीत ढकलून पित्याने जीवन संपवले, बुलडाण्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना

Maharashtra Accident: सोमवार ठरला ‘अपघातवार’; एकच दिवशी १४ जणांचा मृत्यू, आंबेनळीत मोटार कोसळून आठ तर तिहेरी अपघातात सहा जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT