गायमुख घाट कामाच्या पहिल्याच दिवशी कोंडी
ठाणे शहर, ता. २६ (बातमीदार) : घोडबंदर रोडवरील गायमुख घाटाच्या कामाला शुक्रवारी (ता. २४) मध्यरात्रीपासून सुरुवात झाली आहे. पुढील चार दिवस हे काम चालणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू असलेल्या या कामासाठी १०० तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी या मार्गावर जड-अवजड वाहनांची प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. रात्री सुरू केलेल्या या कामामुळे जेएनपीटी येथून रात्री उशिरा निघालेल्या वाहनांना घोडबंदर मार्गावरून बाहेर पडण्यास वेळ लागला. परिणामी या मार्गावर वाहतूक कोंडी झाली.
गायमुख घाटाचा तीव्र उतार आणि चढाव या मार्गावरील वाहनांची कोंडी करणारा ठरतो. त्यामुळे या घाटाचे काम दरवर्षी करावे लागते. यंदाही या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. घाटातील माथ्यावरून कामाला सुरुवात केली आहे. शनिवारी (ता. २६) पहिल्या दिवसाचे काम सुरू असताना या घाटावर गुजरातकडे जाणारी एकेरी वाहतूक सुरू ठेवली होती; मात्र रात्रीपासून या मार्गावर जड वाहनांची प्रचंड रांग लागलेली असल्यामुळे ती पूर्ण रिकामी करण्यासाठी बराच वेळ लागला. दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत ही कोंडी होती. या कोंडीचा सकाळीच शाळकरी विद्यार्थी आणि नोकरदारांना मोठा फटका बसला.
गरज असेल तरच प्रवास करा
गुजरातकडून येणाऱ्या वाहतुकीचीदेखील फाउंटन नाक्यापर्यंत कोंडी झालेली दिसली. तर संध्याकाळी येथील कोंडी दूर होऊन हा रस्ता कामासाठी मोकळा झाला. २९ एप्रिलच्या रात्री १२ वाजेपर्यंत या घाटाचे काम पूर्ण होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर नागरिक आणि हलक्या वाहनचालकांनी गरज असेल तरच काम सुरू असेपर्यंत या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.