विशेष सर्वसाधारण सभेतील ठराव नंतर रद्द कसे करावेत?
सेतू सहकाराचा
ॲड. शरदचंद्र देसाई
वकील, सहकार न्यायालय
प्रश्न - आमच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच १ एप्रिल रोजी झाली. त्यात काही ठराव संमत करण्यात आले. आता या संमत ठरावांमध्ये बदल किंवा ते रद्द करण्यातबाबत काही हितसंबंधी सभासद आग्रह धरीत आहेत. याविषयी उपविधीमधील तरतुदींनुसार सल्ला द्यावा.
उत्तर - विशेष सर्वसाधारण सभा ही केवळ तिच्या कार्यक्रमपत्रिकेतील विषयांबाबतच चर्चा करून निर्णय घेण्यासाठी असते. कोणत्याही सर्वसाधारण सभांमधील निर्णय साध्या बहुमताने होतात आणि मतदान केवळ उपस्थित सभासदांमध्येच करण्यात येते. असे निर्णय ग्राह्य, योग्य व कायदेशीर मानले जातात. या निर्णयांबाबत सभासदांना त्यांचा कच्चा मसुदा माहितीसाठी पाठवणे अपेक्षित आहे. आदर्श उपविधी क्रमांक १०९ नुसार जे ठराव मंजूर झाले आहेत ते बदलण्याचा, रद्द करण्याचा किंवा त्यामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार हा केवळ सर्वसाधारण सभेलाच असतो. परंतु आदर्श उपविधी क्रमांक १०९ नुसार केलेल्या ठरावामध्ये सहा महिने झाल्याशिवाय कोणताही बदल करता येत नाही. तसेच त्याआधीच असा बदल केला तर तो कायद्याच्या कक्षेत येत नाही. सबब सर्वसाधारण सभेने एकदा संमत केलेला ठराव सहा महिन्यांत बदलणे कायद्याच्या दृष्टीने अयोग्य आहे.
(सहकार कायदा तसेच सहकारी संस्था यासंदर्भातील प्रश्नांसाठी कृपया खालील ई-मेल आयडीवर संपर्क साधावा.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.