मुंबई

अवैध पार्किंगचा विळखा

CD

अवैध पार्किंगचा विळखा
सम- विषम फलकाकडे दुर्लक्ष; वाहनचालक त्रस्‍त
तुर्भे, ता. २६ (बातमीदार) ः नियोजनबद्ध शहराची बिरुदावली मिरवणाऱ्या नवी मुंबई शहरात पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जटील होत चालला आहे. शहरातील अनेक भागांमध्ये सम- विषम पार्किंग बाबत पालिका प्रशासनाकडून बोर्ड लावण्यात आलेले आहेत. मात्र बोर्ड असून देखील रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. सर्वाधिक वाहतूक कोंडीची समस्या ही वाशी, नेरूळ, कोपरखैरणे, घणसोली आदी विभागात पाहायला मिळते. ट्रॅव्हल बस, सिलेंडरच्या गाड्या, टेम्पो, कार अशा वाहनांची पार्किंग केली जात आहे.
नवी मुंबई शहराचा विकास झपाट्याने झाल्याने पार्किंगच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सिडकोने सुनियोजनबद्ध वसवलेल्या या शहरातील बेलापूर ते दिघा या उपनगरात सम-विषम पार्किंगसाठीचे फलक मोठ्या प्रमाणात लावले आहेत. परंतु मागील काही वर्षापासून शहरात मोठ्य प्रमाणात वाहनांची संख्या वाढल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर मिळेल तिथे गाड्या पार्क केल्या जात आहेत. यात वाशी, कोपरखैरणे, बेलापूर आदी मुख्य विभागात पार्किंगचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. अशातच पालिकेने विकास आराखड्यात पार्किंगसाठी व विविध सामाजिक कारणांसाठी राखीव ठेवलेल्या भूखंडांची सिडकोने विक्री करण्यास सुरुवात केली आहे. त्‍यामुळे पालिका व सिडकोमधील असमन्वयाचा फटका पार्किंगला बसत आहे. यामध्ये एपीएमसी मार्केटमधील वाहन पार्किंगसाठी असलेल्या आरक्षित भूखंडावर सिडकोकडून घरकूल योजना राबवली जात आहे. त्यामुळे एपीएमसीमधील लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी असणारा हक्काचा भूखंडदेखील हातातून निघून गेला आहे. सध्या आंब्याचा हंगाम सुरू असल्याने सकाळ- संध्याकाळ वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागतो. वाहन पार्किंगसाठी जागा नसल्याने चालकांना नाईलाजास्तव वाहने रस्त्याच्या कडेला कुठेही पार्क करावी लागतात.
...................
नवी मुंबई शहरात बेकायदा पार्किंगवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती घेऊन बेकायदा पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
- तिरुपती काकडे, उपायुक्त, वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपातीची घोषणा; 1 जूनपासून निर्णय लागू पण खरी गोष्ट वेगळीच

Petrol-Diesel Rate: आज देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात किती वाढ झाली? तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या...

IPL 2026 Final: IPL 2026 चा 'फायनल' सामना रद्द झाल्यास कोण बनणार विजेता ? RCB की GT, काय आहे नियम

Nagpur Heatwave Deaths : नागपुरात उष्माघाताचा कहर ! एकाच दिवशी तिघांचा मृत्यू, प्रशासन अलर्टवर

NDA Success Story: जिद्द, चिकाटी अन् कठोर प्रशिक्षणाचा विजय; पदकविजेत्या छात्रांनी उलगडला तीन वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT