मुंबई

१२ वर्षीय मुलीची १७ वर्षीय मुलाने केली हत्या

CD

शरीरसंबंधास नकार;
१२ वर्षीय मुलीची हत्या
अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात
नवी मुंबई, ता. २६ (वार्ताहर) : शरीरसंबंधास नकार दिल्याने शिरवणे एमआयडीसी परिसरातील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीची त्याच परिसरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. २५) रात्री उघडकीस आली. मृत मुलगी दुपारपासून बेपत्ता होती; मात्र रात्री उशिरा एमआयडीसीतील डोंगराळ भागात तिचा मृतदेह आढळला. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी तपास करीत अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले.
अल्पवयीन मुलगा व मृत मुलगी हे एकमेकांच्या परिचयातील होते. शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मुलाने मुलीला घरापासून काही अंतरावर असलेल्या डोंगराळ भागात नेले. तिथे मुलीकडे शरीरसंबंधाची मागणी केली; मात्र तिने नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात मुलाने डोक्यात दगड घालून मुलीची हत्या केली. घटनेनंतर मुलीचा मोबाईल सोबत घेऊन मुलाने पळ काढला. दरम्यान, मुलगी दुपारपासून बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला; मात्र ती न सापडल्याने तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला. पोलिसांना रात्री उशिरा शिरवणे एमआयडीसीतील डोंगराळ भागामध्ये मुलगी जखमी अवस्थेत सापडली. तिला डी. वाय. पाटील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अल्पवयीन मुलाविरोधात हत्या आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली. त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
---
मोबाईल देण्यास गेला अन् फसला
बेपत्ता मुलीचा मोबाईल रस्त्यात सापडल्याने सांगत मुलाने तिच्या घरी तो आणून दिला. त्यावरून पोलिसांना त्याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि मोबाईलचा तांत्रिक तपास केला असता मुलगा खोटे बोलत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मुलाची कसून चौकशी केली असता, त्याने हत्येची कबुली दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT