मुंबई

पालघरमध्ये बियाणे, खतांचा मुलबक साठा

CD

पालघर, ता. २६ (बातमीदार) : जिल्ह्यात कृषी अवजारे, बी-बियाणे आणि खते यांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. शेतकरी बांधवांना बी-बियाणे आणि खते कमी पडणार नाहीत, असे प्रतिपादन पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे मान्सूनपूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पालकमंत्री नाईक बोलत होते. या बैठकीला खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार स्नेहा दुबे-पंडित, आमदार राजन नाईक, आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासुर, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पावसाळ्यामध्ये धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्यापूर्वी नदीकाठावरील गावांमध्ये दवंडी देऊन गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत स्तरावरून करावे तसेच पावसाळ्यामध्ये रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी रेल्वे विभागाने पावसाळ्यापूर्वी ज्या ठिकाणी पाणी जमा होते अशा ठिकाणी भराव टाकावा, रेल्वे सेवेमध्ये कोणताही अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री नाईक यांनी दिले.

वादळी वाऱ्याचा इशारा हवामान विभागाने दिल्यावर मत्स्यव्यवसाय विभागाने तत्काळ मच्छीमारांना समुद्रात जाण्यापासून रोखावे. जे मच्छीमार समुद्रात गेले असतील त्यांना सुरक्षित किनाऱ्यावर आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात, तसेच पावसाळ्यात एखादी परिस्थिती उद्भवली असता नजीकच्या शाळेत स्थानिकांची राहण्याची सोय करता येण्यासाठी ज्या शाळा सुस्थितीत नसतील त्या पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करून घ्याव्यात, तसेच डहाणू आणि जव्हार येथील प्रकल्प अधिकारी यांनी आश्रमशाळा सुस्थितीत आहेत का, याची पाहणी करून त्या सुस्थितीत कराव्यात, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

ग्रामपंचायतीचा सन्मान
कृषी आणि वन विभाग यांनी संयुक्तरीत्या सुरंगी या सुगंधित झाडाची लागवड करावी. एक सुरंगीचे झाड १०० एकर परिसरामध्ये सुगंध देते, अशा महत्त्वपूर्ण झाडाची लागवड कृषी आणि वन विभाग यांनी करावी, असे निर्देश कृषी आणि वन विभागाला पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले. तसेच खानिवडे ग्रामपंचायतीने उत्कृष्ट काम केल्याबद्दल पंचायत राज दिनानिमित्त पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"आता त्याचे हातच बांधावे लागतील!" शुभमन गिल IPL 2026 Final आधी कोणाबद्दल असं बोलला?

Maharashtra Security Force: बेलगावच्या शेतकरी पुत्र शुभम मोताळे यांची महाराष्ट्र सुरक्षा बलात निवड

US Blockade: अमेरिकेची नाकेबंदी निष्फळ? समुद्री मार्ग बंद, तरी इराणचा नवा डाव; रेल्वेने चीन आणि पाकिस्तानला तेल पुरवठा

३० फेब्रुवारीला जन्म, कागदपत्र पाहून मुस्लीम महिलेची याचिका फेटाळली; भारतीय मानण्यास हायकोर्टानं दिला नकार

दारुत मिथेनॉल, 4 आरोपींना 8 जूनपर्यंत कोठडी

SCROLL FOR NEXT