मुंबई

‘क्लस्टर’विरोधात रणशिंग

CD

‘क्लस्टर’विरोधात रणशिंग
मानपाड्यात नोंदणी क्रमांकांवर स्‍थानिकांनी फासला पांढरा रंग
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : मानपाडा, आझादनगर, मनोरमानगर येथील प्रस्तावित क्लस्टर डेव्हलपमेंटविरोधात (समूह विकास) स्थानिकांनी रणशिंग फुंकले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी आपल्या घरावर टाकलेल्या नोंदणी क्रमांकाला पांढरा रंग फासण्यास सुरुवात केली आहे. विरोध असतानाही प्रशासन क्लस्टर लादत असल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला असून, त्याला पाठिंबा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दर्शविला आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी क्लस्टर योजना ठाण्यात राबविली जात आहे. अनधिकृत धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना हक्काचे घर मिळावे, हा या क्लस्टरचा मुख्य हेतू होता. पण आता क्लस्टरच्या नावाने पालिका प्रशासनाने मनमानी सुरू केली असल्याचा आरोप होऊ लागला असून, अनेक ठिकाणी त्याला विरोध दर्शवला जात आहे. एसआरए, पुनर्विकासाच्या मार्गावर असलेल्या आणि म्हाडा भूखंडावरील रहिवाशांनी याआधीच क्लस्टरविरोधात भूमिका घेतली आहे. त्यात आता मानपाडा, मनोरमानगर, आझादनगर आदी परिसराचीही भर पडली आहे. या परिसरात ठाणे महापालिकेकडून क्लस्टर डेव्हलपमेंट (समूह विकास) योजना राबविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. स्थानिक नागरिकांचा विरोध असतानाही ही योजना राबविण्यात येत असून, जानेवारीत येथील शाळांवर हातोडा चालविण्यात आला. प्रशासनाकडे विरोध नोंदवूनही क्लस्टरसाठी जबरदस्ती लादली जात असल्याने आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी (ता. २६) मानपाडा परिसराला भेट दिली.

क्लस्टर योजना बिल्डरधार्जिणी : आव्हाड
स्थानिकांचा विरोध पाहता आमदार आव्हाड यांनीही आक्रमक भूमिका घेत सर्वप्रथम क्लस्टरसाठी घराबाहेर टाकण्यात आलेले नोंदणी क्रमांक पुसण्याचे आव्हान रहिवाशांना केले. आव्हाड यांनी काही घरांची नोंदणी पुसल्यानंतर इतर रहिवाशांनीही नोंदणी क्रमांकावर पांढरा रंग फासला. ‘घरावर आलात तर शिंगावर घेऊन भिरकावून देऊ. क्लस्टर योजनाच बिल्डरधार्जिणी आहे. ती आम्ही उधळून लावणारच आहोत. मानपाड्यात पडलेली ही ठिणगी आता शहरभर पसरणार आहे,’ असा इशारात आव्हाड यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT