मुंबई

अल्पवयीन मुलाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

CD

अल्पवयीन मुलाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नवी मुंबई, ता. २६ (वार्ताहर) : नेरूळमध्ये राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या नात्यातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे गर्भवती राहिलेली पीडिता प्रसूत झाली आहे. या घटनेनंतर नेरूळ पोलिसांनी पीडित मुलीवर अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.
पीडित मुलगा व अल्पवयीन आरोपी हे नातेवाईक असल्याने अल्पवयीन मुलाचे पीडितेच्या घरी येणे-जाणे होते. ऑगस्टमध्ये मुलगा पीडितेच्या घरी गेला होता. त्या वेळी पीडिता घरामध्ये एकटी असल्याची संधी साधून मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतरदेखील या अल्पवयीन मुलाने पीडितेवर अनेक वेळा अत्याचार केले. त्यामुळे पीडिता गर्भवती राहिली; मात्र याबाबतची माहिती पीडितेने आपल्या कुटुंबीयांपासून लपवून ठेवली. चार दिवसांपूर्वी पीडितेच्या पोटात दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर पीडिता गर्भवती असल्याचे तिच्या कुटुंबीयांना समजले. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला सोलापूर येथील आपल्या मूळ गावी नेल्यानंतर त्याठिकाणी पीडित मुलगी प्रसूत झाली. त्यानंतर मुलीवर अत्याचार करणारा मुलगा हा नातेवाईकच असल्याचे समजल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पंढरपूर शहर पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी नेरूळ पोलिसांकडे वर्ग केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT