मुंबई

मनसेच्या प्रतिसभागृहाकडे राजकीय पक्षांची पाठ

CD

मनसेच्या प्रति सभागृहाकडे राजकीय पक्षांची पाठ
नागरी प्रश्नांवर चर्चा; समस्या पालिका आयुक्तांकडे पाठविणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संकल्पनेतून आज मुंबई महापालिकेच्या धर्तीवर प्रतीकात्मक सभागृह भरवून नागरी समस्यांना वाचा फोडण्याचा मनसेने प्रयत्न केला. प्रति सभागृहात सर्वपक्षीय प्रतिनिधी असावेत, म्हणून मनसेने निमंत्रणे पाठविली होती; मात्र सर्वच पक्षांनी या प्रति सभागृहाकडे पाठ फिरविली. त्यामुळे फक्त मनसेने सभागृह चालवून मुंबईतील नागरी समस्यांवर चर्चा केली. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे या समस्या निवारण्यासाठी पाठविण्याचा निर्णय प्रतीकात्मक सभागृहाचे महापौर संदीप आचार्य यांनी दिला.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या संकल्पनेतून प्रति सभागृहाचे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना मनसेने या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे यांना निमंत्रित केले होते. त्यामुळे भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी या कार्यक्रमाला येणे टाळल्याची चर्चा सुरू होती. शिवसेना ठाकरे पक्षाचा प्रतिनिधीही या कार्यक्रमाकडे फिरकला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राखी जाधव, काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, समाजवादी पक्षाचे रईस शेख, शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनाही निमंत्रणे पाठविली होती. या सर्वांनी या सभागृहाकडे पाठ फिरविली. त्यांनी आपला प्रतिनिधीही पाठविला नसल्याचे सांगण्यात आले.

मुंबई महापालिकेची मुदत संपून तीन वर्षे उलटली असून, प्रशासक म्हणून पालिका आयुक्त पालिकेचा कारभार चालवत आहेत. राज्यातील सर्वच महापालिकांत ही परिस्थिती आहे. नागरी समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक नाहीत. मुंबई महापालिकेचा राखीव निधी खर्च होत आहे. राज्य सरकारकडे सुमारे १३ हजार कोटी रुपये थकबाकी आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ४५ टक्के रुग्ण मुंबईबाहेरून येत आहेत. राज्य आणि केंद्र सरकार कोणतीही मदत करीत नाही. नागरी प्रश्न ऑनलाइन कसे सोडवणार, असा सवाल प्रति सभागृहाचे महापौर संदीप आचार्य यांनी केला.
----
सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडले प्रश्‍न
दोन वर्षांत मंजूर केलेल्या रस्ते कामांपैकी केवळ २१ टक्के काम पूर्ण झाली आहेत. अपेक्षित गुणवत्तापूर्ण कामे करून रस्ते मुंबईकरांना कधी मिळणार, असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला. रस्ते, खड्डे आणि नालेसफाई यांची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी त्यांनी केली. या वेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी आणि सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी नागरी सुविधांबाबतचे प्रश्न मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakt Tanpure: शरद पवार गटाचा किल्ला ढासळणार, राष्ट्रवादीचा पहिला आमदार भाजपच्या वाटेवर; राजकारण पालटणार

Horoscope : जूनच्या सुरुवातीलाच बदलणार 'या' 3 राशींचे नशीब; नोकरी-धंद्यात मोठी कलाटणी, बनतोय धनलाभ योग

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

SCROLL FOR NEXT