प्रति तुळजापूर मंदिर म्हणून उद्यास येईल : आमदार जितेंद्र आव्हाड
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : तुळजापूर येथे ज्याप्रमाणे आई तुळजाभवानीची वर्षभर पूजाअर्चा केली जाते, त्याचप्रमाणे येथेदेखील मंदिरात देवीची पूजाअर्चा करण्यात येणार असून हे मंदिर भविष्यात प्रति तुळजापूर मंदिर म्हणून उदयास येणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तसेच, हे सर्वसामान्यांचे श्रद्धास्थान बनणार असून या मंदिरावर कुणाचाही ताबा नसेल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात तुळजाभवानी आईचे मंदिर उभारण्यात आले आहे. हे मंदिर काळ्या पाषाणात उभारण्यात येत आहे. तमिळनाडूतील सेलम आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील दगडखाणीतून कृष्णशिळा कर्नाटकातील मुरूडेश्वर येथे आणण्यात आल्या. असेंड एडकाॅमचे संदीप लोट यांच्या सल्ल्यानुसार वास्तुविशारद संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दानश्री शिल्पकला केंद्राचे मंजुनाथ देवाडिगा यांनी या कृष्णशिळांना आकार देण्यास सुरुवात केली. शिखर कलश, नवग्रह, दगडी स्तंभ, आकर्षक कलाकुसर, हत्ती या कृष्णशिळेतून साकारून ठाण्यात आणण्यात आले आहेत. काही शिळांना ठाण्यातच आकार दिला गेला. लोप पावत असलेल्या हेमाडपंथी शैलीला पुनर्जीवित करीत हे मंदिर साकारले आहे. पाषाणाव्यतिरिक्त अन्य साधनांचा वापर न करता, हे मंदिर उभारण्यात आले असल्याची माहिती आमदार आव्हाड यांनी या वेळी दिली. तसेच या मंदिरावर मंगळवारी (ता. २९) कळसाची स्थापना करण्यात येणार आहे. ब्रह्मचारीच्या हस्ते कळसाची मंदिरावर स्थापना केली जाणार आहे. तर, बुधवारी (ता. ३०) मंदिरातील तुळजाभवानी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.