मुंबई

बंगालच्या हिसांचाराविरोधात भाजपचे आंदोलन

CD

बंगालच्या हिंसाचाराविरोधात भाजपचे आंदोलन
मुंबई, ता. २६ : संविधानाच्या चौकटीत राहून लोकशाही मूल्यांनुसार, नियमानुसार लागू केलेल्या वक्फ कायद्याचा विरोध करायचा तर लोकशाही पद्धतीने करा, कोर्टाचा दरवाजा ठोठावा. पश्चिम बंगालमध्ये धार्मिक भावना भडकावून केलेला हिंसाचार म्हणजे संविधानाचा अपमान आहे, अशी टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष व कॅबिनेट मंत्री ॲड. आशीष शेलार यांनी शनिवारी (ता. २६) केला.

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराविरोधात भारतीय जनता पक्षाच्या बंगाली प्रकोष्ठच्या वतीने प्रदेश कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी ॲड. शेलार बोलत होते. या वेळी ज्येष्ठ नेते विजय तथा भाई गिरकर, बंगाली प्रकोष्ठचे संयोजक रंजन चौधरी, सुभागत दास, सरचिटणीस निरंजन बोस, मिरा रोडच्या प्रकोष्ठच्या महिला अध्यक्ष मंजुला बसक, रहिम दत्ता आदी उपस्थित होते. पश्‍चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी भाजप बंगाली प्रकोष्ठच्या वतीने या वेळी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय

MI vs RR: आधी आऊट, मग नो बॉल अन् चौकार... जडेजाने शार्दुल ठाकूरची भर मैदानात उडवली खिल्ली! Video होतोय Viral

Sangli Advocate Death : 'माझ्या मृत्यूला कोणालाही...'; मरण्यापूर्वी 27 वर्षीय वकिलाने चिठ्ठीत काय लिहिलं? सांगलीतील घटनेने खळबळ

आश्रम ३ मधील इंटीमेट सीनवर पहिल्यांदाच बोलला बॉबी देओल, म्हणाला, 'मी फार घाबरलो होतो'

विधानपरिषदेआधी काँग्रेसला धक्का? ७० नगरसेवक नॉट रिचेबल; राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT