मुंबई

एआयच्या मदतीने सुपरस्टार तयार करीन : शेखर कपूर

CD

एआयच्या मदतीने सुपरस्टार तयार करीन : शेखर कपूर

मुंबई, ता. ४ : ‘एआयच्या मदतीने मी स्वतः एक नवीन चेहरा तयार करू शकतो. मग तो मुलगा असो, मुलगी असो, पुरुष असो किंवा स्त्री असो आणि त्यावर माझा कॉपीराइट असेल. मी स्वतः बनवलेल्या स्टारचा मी माझ्या चित्रपटात वापर करू शकेन,’ असे वक्तव्य शेखर कपूर यांनी रविवारी (ता. ४) ‘वेव्हज् २०२५’ या संमेलनात केले.

कपूर यांनी सांगितले, ‘चित्रपट क्षेत्र आता अशा वळणावर आहे जिथे मोठ्या स्टार्सची आवश्यकता उरत नाही. आता मला अमिताभ बच्चन किंवा शाहरुख खानसारख्या मोठ्या अभिनेत्यांची गरज नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ही तंत्रज्ञानाची क्रांती आता अशी पात्रे तयार करू शकते, जी खऱ्या माणसांसारखी दिसतील आणि अभिनय करतील. त्यांनी हेही अधोरेखित केले की सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले अनेक चेहरे हे वास्तवात एआयने निर्माण केलेले असूनही प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे असे स्टार्स केंद्रस्थानी ठेवून चित्रपट तयार करण्याची संधी प्रत्येक निर्मात्याला उपलब्ध होईल.’ पुढे ते म्हणाले, ‘मानव भावना समजू शकतो आणि अज्ञात गोष्टींना सामोरे जाऊ शकतो, हे एआयला शक्य नाही.’ त्यामुळे त्यांनी तंत्रज्ञानावर विश्वास दाखवतानाही मानवी सर्जनशीलतेचे महत्त्वही अधोरेखित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! वर्षा गायकवाडांकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी; 'या' तीन नामवंतांनाही मिळाली संधी

खलनायक ते राजकारणी: ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचा प्रवास थांबला; 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Bar Strike : मद्यपींसाठी महत्त्वाची बातमी! राज्यभरातील बार उद्या राहणार बंद; HRAWI चा जाहीर पाठिंबा, काय आहे कारण?

Kolhapur : ए. एस. ट्रेडर्सच्या माध्यमातून कोल्हापूर व बेळगावातील गोरगरिबांना लुटायचा, पोलिसांनी ट्रॅप लावून मुख्य एजंटला केली अटक

Latest Marathi News Updates : लाडक्या बहिण योजनेमुळे विकास निधी येण्यास विलंब - मंत्री दत्तात्रय भरणे

SCROLL FOR NEXT