मुंबई

आमदार ठाकूर यांच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न

CD

पनवेल, ता. ७ (वार्ताहर) : पनवेलमधील भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावाने एका अज्ञात व्यक्तीने अनेक लोकांना संपर्क साधून त्यांना एका गुंतवणूकदाराला पैसे देण्यास सांगून फसवणूक करत असल्याचे उघडकीस आले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल शहर पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
पनवेलमधील आमदार प्रशांत ठाकूर यांचा सेक्रेटरी असल्याचे भासवून एका व्यक्तीने पनवेलमध्ये राहणाऱ्या दिलीप चव्हाण यांना ३ मे रोजी संपर्क साधला होता. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने आमदार प्रशांत ठाकूर बोलत असल्याचे भासवून चव्हाण यांच्याशी हिंदीमधून बोलण्यास सुरुवात केली. या वेळी स्वत:ला आमदार ठाकूर म्हणवणाऱ्या व्यक्तीने आपल्या सेक्रेटरीकडे पैसे देण्यासाठी दिलीप चव्हाण यांना सांगितले; मात्र चव्हाण यांना समोरील व्यक्तीबाबत संशय आल्याने त्यांनी उलट चौकशी करण्यास सुरुवात केल्यानंतर समोरील व्यक्तीने फोन कट केला. त्यानंतर दिलीप चव्हाण यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना या प्रकाराची माहिती दिली. त्या व्यक्तींनी अनेक लोकांना अशाच पद्धतीने संपर्क साधून त्यांचीदेखील फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांना माहिती मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : माझ्याकडे पैसे नाहीत, वेतन रोखल्यानं TCSच्या ऑफिसबाहेर फूटपाथवर झोपला तरुण; कंपनीनं दिलं स्पष्टीकरण

Team India's Next schedule: इंग्लंड दौरा संपला, पुढे काय? टीम इंडियाच्या पुढील सर्व स्पर्धा, मालिकांचे वेळापत्रक एका क्लिकवर

Kolhapur Village Gold Rain : पाऊस पडला की 'या' गावात शेतामध्ये सोनं सापडतेच, अनेक वर्षांपासून प्रत्यय

Daily Exercise Benefits: रोज फक्त 30 मिनिटं व्यायाम करा अन् कर्करोगाचा धोका 30% कमी; संशोधनातील मोठा खुलासा

'आज की रात...' हे गाणं एकल्याशिवाय मुलं जेवतच नाही' तमन्नाच्या वक्तव्यावर नेटकरी म्हणाले...'अशा प्रकारच्या पार्टी...'

SCROLL FOR NEXT