मुंबई

दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आणि युद्धाचा तणाव

CD

युद्धाचा तणाव कमी करण्यासाठी जोरकस राजनैतिक उपाय गरजेचा
विरार, ता. ११ (बातमीदार) ः पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या २६ निष्पाप लोकांच्या हत्येचा सर्वांनीच साहजिक निषेध केला आहे. त्यानंतर भारतीय सशस्त्र दलांनी ९ ठिकाणी हल्ले करून दहशतवादी तळांना लक्ष्य केल्याचे प्रतिपादन केले. तथापि, त्यानंतर पाकिस्तान आणि भारताच्या सशस्त्र दलांमध्ये हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू झाले आहेत. पाकिस्तानने सीमेवर केलेल्या गोळीबारात अनेक लोक मारले गेल्याचे वृत्त आहे. त्यात प्रामुख्याने सीमावर्ती भागातील शेतकरी आणि शेतमजुरांचा समावेश आहे. यासाठी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आणि युद्धाचा तणाव कमी करण्यासाठी जोरकस राजनैतिक उपाय ही तातडीची गरज असल्याचे अखिल भारतीय किसान सभेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष *डॉ. अशोक ढवळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात हटले आहे की, सभेला हा विश्वास आहे की, युद्धांचा फायदा फक्त सत्ताधारी वर्ग आणि त्यांच्या साम्राज्यवादी समर्थकांना होत असतो. युद्धांमुळे श्रमिक जनतेला अतोनात त्रास होतो. किसान सभेचे मत आहे की, सध्याचे संकट कमी करण्यासाठी आणि दहशतवाद्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना कायद्यासमोर आणण्यासाठी जोरकस राजनैतिक उपाययोजनांना प्राधान्य दिले पाहिजे. केंद्र सरकारने आंतरसरकारी दहशतवादविरोधी निधी फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ)मधील तरतुदींचा वापर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत आणि पाकिस्तान सरकारवर दबाव आणला पाहिजे, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
.............
स्री- हे अद्भूत रसायन : डॉ. स्मिता दातार
विरार, ता. ११ (बातमीदार) ः स्री हे अद्भूत रसायन आहे, असे सांगून महाभारत काळापासून ते आजपर्यंतच्या स्री जीवनातील स्थित्यंतराचा आढावा डॉ. स्मिता दातार यांनी घेतला. त्या वसईतील उमराळ येथे संजीवनी व्याख्यानमालेत स्री काल, आज आणि उद्या या विषयावर बोलत होत्या. या वेळी त्यांनी स्री-पुरुष शारीरिक घडण आणि मेंदूतील फरक समजावून सांगितले. आरोग्यविषयी स्त्रीयांनी काळजी घेतली पाहिजे, जंक फूड टाळायला हवे. स्त्रियांमध्ये वात्सल्य हार्मोन्स असतात, त्याचा उपयोग करून कुटुंब, पुढची पिढी चांगल्या पद्धतीने घडवू शकते, असे त्यांनी या वेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाती नाईक होत्या, तर नेत्रा नाईक यांनी पाहुण्यांची ओळख आणि प्रास्ताविक केले. सुरुवातीला सुविधा नाईक यांनी आईसारखे दैवत नाही, हे गीत सादर केले. त्यांना अरवींद पाटील व प्रदीप पाटील यांनी साथसंगत केली. निधी नाईक हिने सूत्रसंचालन केले.
..............
कुटुंबसंस्था सुदृढ राहण्यासाठी योग्य वयात लग्न करणे महत्त्वाचे : बिशप थॉमस डिसोजा
विरार, ता. ११ (बातमीदार) ः‌ कुटुंबसंस्था हे निर्मितीचे कार्य करते. त्‍यामुळे कुटुंबसंस्था सुदृढ राहण्यासाठी तरुण-तरुणींनी योग्य वयात लग्न करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी चर्चमधून विविध कार्यक्रमांद्वारे तरुण-तरुणी व त्यांच्या आई-वडिलांस समुपदेशनाद्वारे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी चर्च करील, असे प्रतिपादन बिशप थॉमस डिसोजा यांनी लोकसेवा मंडळाच्या विद्यमाने सर्व ख्रिस्ती परिवारांसाठी ख्रिस्ती वधू-वर सूचक समितीच्या कार्यकर्त्यांना केले.
वसईमध्ये लोकसेवा मंडळाच्या विद्यमाने सर्व ख्रिस्ती परिवारांसाठी ख्रिस्ती वधू-वर सूचक समिती (बंगली नाका, सांडोर, वसई) तर्फे विवाह जुळविण्याचे कार्य मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. आतापर्यंत ६५० वधू-वरांचे रजिस्ट्रेशन झालेले असून, १०० पेक्षा जास्त उमेदवारांची नाती जुळविण्यामध्ये समिती यशस्वी झालेली आहे. समितीचे कार्यकर्ते सभागृहात उपस्थित राहून रजिस्ट्रेशन व उमेदवाराच्या योग्यतेप्रमाणे त्यास योग्य साथीदार सुचविण्याचे काम करीत असतात, परंतु ख्रिस्ती समाजातल्या मुली या समितीमध्ये नाव नोंदविण्यास उत्स्फूर्तपणे पुढे येत नाहीत. त्यांना संकोच वाटतो. कदाचित जास्त शिक्षणामुळे त्यांना मॅरेज ब्युरोमध्ये नाव नोंदविणे हे कमीपणाचे वाटत असावे. करिअरला जास्त महत्त्व दिल्यामुळे मुलीचे वय वाढत आहे. लिव्ह इन रिलेशन, लग्न जुळवितांना अपेक्षांचा प्रचंड बाजार, सासू-सासऱ्यांचा जाच नको इ. कारणांमुळे लग्ने जुळविणे म्हणजे तारेवरील कसरत ठरत आहे. या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी व बिशपांचे मार्गदर्शन घेण्यासाठी समितीच्या २४ सामाजिक कार्यकर्त्यांची एक सभा वसई बिशप हाऊस येथे नुकतीच पार पडली होती. बिशप थॉमस डिसोझा यांनी अत्यंत सकारात्मकरित्या, निःसंधिग्धपणे सूचक समितीच्या सर्व सूचनांचा विचार करण्याचे मान्य केलेले आहे. याप्रसंगी शादी-डॉट-कॉमसारखे ॲप विकसित करावे, सोयरिक झालेल्या वधू-वरांचा मेळावा आयोजित करावा, तसेच अधून-मधून कार्यक्रमाचे रील तयार करून प्रसिद्धी द्यावी अशा सूचना मांडण्यात आल्या. या प्रसंगी ख्रिस्ती वधू-वर सूचक समितीचे प्रमुख लुकस परेरा यांनी समितीचे कार्याविषयी माहिती दिली व ख्रिस्‍ती बांधवांकडून मिळणाऱ्या अल्प प्रतिसादाबद्दल खंत व्यक्त केली. तसेच लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष गॉडफ्री कोरीया व ज्येष्ठ समाजसेवक थॉमस ब्रिटो, प्राचार्य जेनेट सिरेजो, विवियन रॉड्रिग्ज, वॉल्टर सिरेजो, लिला परेरा यांनी भाग घेतला.
............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT