मुंबई

पैसे भरलेल्या ४१ हजार ग्राहकांना वीज जोडणीची प्रतीक्षा

CD

पैसे भरलेल्या ४१ हजार ग्राहकांना वीजजोडणीची प्रतीक्षा
महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : महावितरणच्या नाकर्तेपणाचा अनेक नवीन वीजजोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या औद्योगिक, वाणिज्य आणि घरगुती वीजग्राहकांना फटका बसत आहे. राज्यभरातील तब्बल ४१ हजार १९९ ग्राहकांनी नवीन वीजजोडणी मिळावी म्हणून महावितरणकडे अर्ज करतानाच पैसेही भरले आहेत. संबंधितांना वीजजोडणी देण्यासाठी कोणतेही नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभारावे लागणार नसतानाही विलंब होत असल्याने ग्राहकांकडून महावितरणच्या काराभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
मुंबई वगळता महावितरणकडे वीज वितरणाचा परवाना आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही ग्राहकाला वीजजोडणी हवी असेल, तर ती महावितरणकडून घेण्याशिवाय पर्याय नाही. या मक्तेदारीमुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचे दिसते. सोमवार (ता. ५)पर्यंत नवीन वीजजोडणीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करतानाच त्याबाबतचे शुल्क भरलेल्या ग्राहकांची संख्या ४१ हजारांहून अधिक आहे. दरम्यान, महावितरणने २३ एप्रिल ते ५ मे या कालावधीत २० हजार ७०८ ग्राहकांना वीजजोडणी दिली आहे, परंतु कोणत्याही त्रुटींशिवाय वीजजोडणीसाठी अर्ज केलेला असतानाही महावितरणकडून ती दिली जात नाही. त्यामुळे तेवढ्या विजेची विक्री होऊ शकत नसल्याने महावितरणचे नुकसान होत आहे.

कुठे किती ग्राहक वीजजोडणीच्या प्रतीक्षेत
कोकण विभाग - १५ हजार ७८८
नागपूर विभाग - १३ हजार २३९
पुणे विभाग - ८ हजार ४०८
छत्रपती संभाजीनगर विभाग - ३ हजार ७६४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vice President Election : NDA चा ‘राजकीय डाव’! उपराष्ट्रपतीपदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी, सध्या आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'ट्रक व टॅंकरच्या अपघातात एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू'; वर्षश्राद्धासाठी जाताना काळाचा घाला..

Asia Cup 2025: केएल राहुलची भारताच्या टी२० संघात का निवड होऊ शकत नाही? कारण आले समोर

Latest Marathi News Updates : भींत कोसळून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Crime: महाराष्ट्र हादरला! एकामागून एक ४ मुलांना विहिरीत फेकलं, वडिलांचं धक्कादायक कृत्य, संतापजनक कारण समोर

SCROLL FOR NEXT