मुंबई

दिव्यांग मुलांची फिनिक्स भरारी

CD

नेरूळ, ता. १५ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या इटीसी दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्रामधील दहावीची परीक्षा देणाऱ्या विशेष मुलांनी आपली १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत घवघवीत यश मिळवले आहे. दिव्यांगत्व असले तरी शैक्षणिक प्रगतीत आपण कमी नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. या यशस्वी मुलांचे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कौतुक केले.
यंदा इटीसी केंद्रातील १९ विशेष मुले दहावी शालांत परीक्षेला बसली होती. हे सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मतिमंद विभागातून कल्याणी अवटे हिने ८५ टक्के संपादन करीत सर्वाधिक गुण प्राप्त केले आहेत. तिच्यासह मतिमंद विभागातून एकूण १४ विशेष मुलांनी सुयश प्राप्त केले आहे. त्यापैकी विनायक पाटील व रिया शिंदे या दोघांना पालक मार्गदर्शनाद्वारे इटीसी केंद्रातून मदत देण्यात आली होती. या व्यतिरिक्त मतिमंद विभागातून उत्तीर्ण होणाऱ्या विशेष मुलांमध्ये मंथन थोरात, द्रोण मढवी, अब्दुल खान, तेजस शेट्टी, विश्लेष कुवर, मंदार रणदिवे, तन्मय कळंबे, आयुष घाडगे, विनायक चव्हाण, स्वरा पाडळे, ईश्वरी दांडगे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
----------------
विविध विभागांतील यशस्वी विद्यार्थी
कर्णबधिर विभागातून मारीया नागलेकर हिने ७७.६० टक्के गुण प्राप्त केले आहेत; तर अध्ययन अक्षमता विभागातून निषाद दवे याने यश प्राप्त केले आहे. अंध विभागातून सूरज भोसले याने दररोज इटीसी केंद्रात उपस्थित राहात; तर श्रावणी बोरे हिने पालक मार्गदर्शनाद्वारे यश संपादन केले आहे. बहुविकलांग विभागातून सोहम पाटील याने यश प्राप्त केले आहे. काही मुलांनी इंग्रजी माध्यमातून; तर काहींनी मराठी माध्यमातून हे यश मिळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वनतारा'मधील हत्ती अंबानींच्या कार्यक्रमात कोणत्या नियमाने वापरतात? राजू शेट्टींचा 'पेटा'ला थेट सवाल; 'तो' फोटो केला शेअर

Vice President Election : ठरलं! ९ सप्टेंबर रोजी देशाला मिळणार नवे उपराष्ट्रपती, निवडणूक कार्यक्रम जाहीर...वाचा संपूर्ण वेळापत्रक

Pune Crime : जमिनीच्या वादातून चुलत भावावर गोळीबार, वाघोली जवळील घटना; बेकायदा पिस्टलचा वापर, तरुणाची प्रकृती स्थिर

Video Vantara Team : 'वनतारा'च्या टीमला कोल्हापुरात आणण्यासाठी कृष्णराज महाडिकांचा प्रयत्न; म्हणाले, 'नांदणीत सर्वजण या...'

Vantara team Kolhapur : वनतारा पथक नांदणीला जाण्याआधीच थांबवले; कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT