मुंबई

बागमांडला-बाणकोट पुलाचे नव्याने काम सुरू

CD

श्रीवर्धन, ता. १९ (वार्ताहर) ः रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या बागमांडला ते बाणकोट पुलाचे काम नव्याने सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे १२ वर्षांपूर्वी केलेल्या कामावरील कोट्यवधींचा खर्च वाया गेल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारी नियोजनातील त्रुटींमुळे जनतेचा पैसा वाया जात असल्‍याने स्थानिकांकडून संताप व्यक्‍त होत आहे.
बागमांडला ते बाणकोट पुलाचे काम सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला मिळाले होते. २०१२-१३ मध्ये पुलासाठी १८२ कोटींचा खर्च अपेक्षित होता. भविष्यात या खाडीतून मोठी जहाजे जातील, या कारणास्तव पुलाची उंची वाढवली व पुलाचा खर्च ४५० कोटींवर गेला. प्रत्यक्षात खाडीतून मोठी जहाजे जातील, एवढी बाणकोटची लांबी, रुंदी आणि खोलीही नाही. दरम्यान, कंपनीने पुलाचे पिलर उभारून काम अपूर्णावस्‍थेत ठेवले आहे. या कामावर किती खर्च झाला, कंत्राटदार कंपनीला किती पैसे दिले याबाबत अधिकाऱ्यांन माहीत नाही, मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नवीन निविदा काढून अलीकडेच नवीन जागी पुलाचे काम सुरू केले आहे. २०१२ मध्ये सुरू झालेले काम २०१५ पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती.
बागमांडला ते बाणकोट पुलाचे भूमिपूजन २०१२-१३ मध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्‍ते धूमधडाक्यात करण्यात आले होते. त्या वेळी राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार होते. भुजबळ हरेश्वर, बागमंडला येथे येणार म्हणून भरपावसात सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे डांबरीकरण केले होते. त्यानंतर झालेल्या अतिवृष्‍टीत अवघ्‍या काही दिवसांत रस्ता पूर्णपणे उखडून गेला होता.

घाटमाथ्‍यावरील प्रवास सुकर होणार
बागमांडला-बाणकोट पुलाचे काम नव्याने सुरू झाले आहे. जुन्या जागेपासून काही अंतरावरच हे काम सुरू आहे. घाटमाथ्यावरून कोकणात येणाऱ्या पर्यटकांना गणपतीपुळेकडून श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगरकडे येण्यासाठी हा पूल महत्त्वाचा असेल. त्याचप्रमाणे पुण्यातून श्रीवर्धनला येणाऱ्या पर्यटकांना गणपतीपुळे किंवा रत्नागिरीला जाण्या-येण्यासाठीही पूल उपयोगी ठरणार आहे.

श्रीवर्धन ः बागमांडला बाणकोट जुन्या पुलाचे काम १२ वर्षांपासून अपूर्ण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma ODI retirement: 'काय निवृत्ती घेऊ? प्रत्येकवेळी जिंकलो म्हणून...' रिषभ पंतला रोहितचा सवाल

Thane News: डोंबिवलीत जुनी इमारत पाडकामात महापालिकेच्या स्कायवॉकचे नुकसान, प्रवाशांसाठी मार्ग बंद

Latest Marathi News Live Updates : पिकअप अपघातातील बाराव्या महिलेचा मृत्यू

Dhananjay Munde: 'सातपुडा' बंगल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस; मुंडेंना धक्का

Instagram Friends Map : इंस्टाग्राममध्ये आलं मॅप फीचर; मुलींच्या सुरक्षेसाठी खूपच फायद्याचं, कसं वापरायचं लगेच पाहा

SCROLL FOR NEXT