मुंबई

अवकाळीमुळे शेतकऱ्यांची गणित बिघडणार

CD

अवकाळीमुळे शेतकऱ्यांची गणितं बिघडणार
दुबार पेरणीची भीती; पावसाच्या लंपडावामुळे कामांना पूर्णविराम
भिवंडी, ता. २१ (बातमीदार) : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अवकाळी पावसामुळे शेतकरी संभ्रमात पडला आहे. एकीकडे मॉन्सूनपूर्व पावसाने तडाखा दिला आहे, तर दुसरीकडे रब्बी हंगामाच्या भातशेतीसह भाजीपाला लागवडीची नासधूस केली आहे.
भातशेतीचाही हंगाम जवळ आला आहे. मागील दोन वर्षांपासून ऐन मॉन्सूनमध्ये वरुणराजाने दडी मारली. या वर्षी ऐन उन्हाळ्यात अवकाळी जोरदार कोसळत आहे. मंगळवारी (ता. २०) सायंकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, ऐन खरीप हंगामात पावसाने दडी मारली तर मात्र शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
सद्य:स्थितीत खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पावसाचा लपंडाव पाहता मशागतीच्या कामांना पूर्णविराम दिल्याचे दिसत आहे.
-------------------------------
भातपिकाचे क्षेत्रफळ
भिवंडी तालुका कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात भातपिकाचे क्षेत्रफळ १६,६८९ हेक्टर आहे. यामध्ये हळव्या भात प्रकाराची शेती चार हजार १७२.२५ हेक्टर तर निमगरवा शेती नऊ हजार १७८.९५ हेक्टर क्षेत्रात आहे. गरवा शेती तीन हजार ३३४.८० क्षेत्रात होत आहे.
-----------------------------
भिवंडी तालुक्यातील एकूण रोपवाटिका क्षेत्र १,६६८.९० हेक्टर इतकी असून, या वर्षी भातशेतीचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढेल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. दुसरीकडे हवामान विभागाच्या मॉन्सूनच्या अंदाजाने शेतकऱ्यांना यावर्षी सुगीचे दिवस येणार असल्याचीही शक्यता आहे.
------------------------------------------------
हवामान विभागाने येत्या ७ जून रोजी राज्यात मॉन्सूनचा अंदाज वर्तविला आहे. त्याअनुषंगाने बियाणे केंद्रांमध्ये भात बियाणी उपलब्ध झाली आहेत.
- ज्ञानदेव शिंदे, कृषी अधिकारी, भिवंडी तालुका
----------------------
MUM25E90672

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिवाळीत मोदी देशाला देणार मोठे गिफ्ट, GST बद्दल केली मोठी घोषणा, करात मिळणार दिलासा

Independence Day 2025 PM Modi : अणुधमक्यांना घाबरणार नाही, ब्लॅकमेल केलं तर...; मोदींचा लाल किल्ल्यावरून असीम मुनीरला इशारा!

Independence Day 2025 : आता मेड इन इंडिया 'सेमीकंडक्टर' चिप बाजारात येणार, पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरुन 'आत्मनिर्भर'ची गर्जना

Independence Day: कसा झाला होता भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन साजरा? पाहा १५ ऑगस्ट १९४७ चा व्हिडिओ

India 79th Independence Day Live : स्वातंत्र्य दिनानिमित्त पवईत ६५ फुटाचा तिरंगा फडकविण्यात आला

SCROLL FOR NEXT