मुंबई

पेण शहराच्या फिल्टरेशन प्लांटची दुरवस्था

CD

पेण शहराच्या फिल्टरेशन प्लांटची दुरवस्था
पेण, ता. २४ (वार्ताहर) : पेण शहरात मागील अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. त्‍यामुळे पेण तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन प्रत्यक्ष पिण्याच्या पाण्याच्या फिल्टर प्लांटची पाहणी केली असता, त्या ठिकाणी शेवाळयुक्त आणि दूषित पाणी दिसून आले. या दूषित पाण्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने या प्लांटची तत्काळ दुरुस्‍ती करावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शहरातील फणस डोंगरी येथे फिल्टरेशन प्लांट असून, येथून पिण्याचे पाणी पुरविले जाते. या ठिकाणाची शिवसेनेकडून पाहणी करण्यात आली. या वेळी अस्वच्छता, पाण्यात साठलेले शेवाळ, प्लांटच्या परिसरात सुरक्षेचा अभाव तसेच पाणी शुद्ध करण्यासाठी वापरला जाणारा खराब आलम टीसीएल पावडर यामुळे नागरिकांच्‍या आरोग्याबरोबर प्रशासन खेळत असल्याचा आरोप सेनेकडून करण्यात आला.
या वेळी फिल्टरेशन प्लांटची झालेली दुरवस्था, पिण्याचे दूषित पाण्याबाबत शिवसेनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली. तसेच येत्या १५ दिवसांत यात सुधारणा न झाल्यास नागरिकांच्या आरोग्यासाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या वेळी जिल्हा समन्वयक नरेश गावंड, महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, तालुका प्रमुख समीर म्हात्रे, युवासेना अधिकारी योगेश पाटील, चेतन मोकल, शहर प्रमुख सुहास पाटील, पेण शहर महिला संघटिका मेघना चव्हाण, नीलेश म्हात्रे, महेश नागे, निखिल पाटील, निशांत पाटील, सनी पाटील, नवीन म्हात्रे, मयूर म्हात्रे, संतोष पाटील आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.....................
शिवसैनिकांनी दिलेल्या निवेदनानुसार पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी आलम टीसीएल अतिशय चांगल्या प्रकारचा वापरण्यात येईल. येथील गेट तुटलेला आहे, तोही येत्या १५ दिवसांत बसविण्याची प्रक्रिया सुरू करून परिसराची स्वच्छतासुद्धा येत्या दोन-तीन दिवसात पूर्ण होईल. यासह काही त्रुटी असतील त्याही येत्या काही दिवसांत पूर्ण केल्या जातील, असे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vedanta Share: एका दिवसात Vedanta कंपनीचे शेअर्स तब्बल 62 टक्यांनी घसरले! नेमकं कारण काय?

DJ Noise Incident : लग्नाच्या वरातीतील डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा, १४० कोंबड्यांचा तडफडून मृत्यू

Latest Marathi News Live Update : विधान परिषद निवडणुकीबाबत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांची बैठक

Congress MLC Candidate Maharashtra : तीन वाजेपर्यंत थांबा काँग्रेसचा उमेदवार समजेल, नाना पटोले स्पष्टच म्हणाले; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य

Bank News: कामाची बातमी! 1 मे ला बँका बंद की सुरू? RBI ची मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT