मुंबई

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

CD

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेमार्गावर रात्रकालीन ब्लॉक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : उपनगरी रेल्वेमार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. २५) मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर ठाणे ते वाशी, नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. दुसरीकडे पश्चिम रेल्वेवर शनिवारी (ता. २४) ते रविवारी (ता. २५) पहाटे  भाईंदर ते  बोरिवली स्थानकांदरम्यान अप जलद मार्गांवर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.


मध्य रेल्वे
कुठे : माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. त्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. ठाण्याहून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि मुलुंड व माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. नंतर त्या माटुंगा स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील.

ट्रान्स हार्बर
कुठे : ठाणे ते  वाशी, नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक काळात वाशी, नेरूळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ वाजेपर्यंत वाशी, नेरूळ, पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा आणि पनवेल, नेरूळ, वाशीहून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पश्चिम रेल्वे
कुठे : भाईंदर ते बोरिवली अप-डाऊन जलद मार्गांवर
कधी :  शनिवारी (ता. २४) मध्यरात्री ११.३० ते रविवारी (ता. २५) पहाटे ०४.४५ वाजेपर्यंत  
परिणाम : ब्लॉक कालावधीत विरार, वसई रोड आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सर्व जलद सेवा या धीम्या मार्गांवर चालवल्या जातील. ब्लॉकदरम्यान काही गाड्या रद्द राहतील. रविवारी उपनगरीय विभागात दिवसाचा ब्लॉक राहणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJP चा उत्तर प्रदेश सरकारविरोधात मोर्चा; दिला निर्वाणीचा इशारा

मी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं... ! वैभव सूर्यवंशीने व्यक्त केल्या भावना; VVS Laxman अन् इशान किशन यांच्याबद्दल म्हणाला...

Chef Kunal's Masoor Dal Pulao: रोजच्या जेवणाचा कंटाळा आला? मग शेफ कुणाल कपूरचा मसूर डाळ पुलाव एकदा करून पाहाच!

अनेकदा मागणी करूनही डिंपल कपाडियांनी राजेश खन्नांना घटस्फोट का दिला नाही? लिव्ह इन पार्टनरने सांगितलं खरं कारण

Commonwealth Games 2026 : पदकाच्या अपेक्षा घेऊन, तो ग्लास्गोत आला अन् पहिल्याच फेरीत बाद झाला; गुरिंदरवीर सिंगच्या Exit ने भारताला धक्का...

SCROLL FOR NEXT