मुंबई

पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात

CD

पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात
पालघर, ता. २३ ः जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २३) विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पालघर परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यानंतर सफाळे आणि बोईसर परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार २२ ते २७ मेदरम्यान जिल्ह्यात किनारी आणि मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी जोरदार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच वादळी वारे वाहतील. त्यामुळेच समुद्र खवळण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.

----------------
जोरदार पावसामुळे झाड घरावर कोसळले : दोन जखमी
वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर
कासा ः डहाणू तालुक्यात गुरुवारी (ता. २२) सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळित केले. यामध्ये निंबापूर गावातील कातकरी वस्ती येथील विनोद रंग्या भोये यांच्या घरावर चिंचेचे झाड कोसळल्याने संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले. या घटनेत विनोद भोये आणि त्यांची पत्नी सुनीता विनोद भोये हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, या आदिवासी कुटुंबाची झोपडीच उद्ध्वस्त झाल्याने राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे.

---------------------
अवकाळी पावसाने पुन्हा झोडपले
पावसाने जनजीवन विस्कळित
मनोर ः पालघर तालुक्याच्या पूर्व भागाला पावसाने झोडपून काढले. शुक्रवारी (ता. २३) विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह सुमारे एक तास पडलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली. तर वाऱ्यामुळे अनेक घरांचे छप्पर उडाले तसेच लग्नाचे मंडप कोसळून पडले. विजेचे खांब कोसळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. नालेसफाई झाली नसल्याने पावसाच्या पाण्याच्या निचरा मनोर बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावरून होत असल्यामुळे रस्त्याला नाल्याचे स्वरूप आल्याने रस्त्यावरील वाहतूक संथगतीने सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT