मुंबई

ठाण्यात १० कोरोना रुग्ण

CD

ठाण्यात १० कोरोना रुग्ण
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसांत कोरोनाचे १० रुग्ण आढळले असून, त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने तसेच सर्व रुग्णालयांनी सतर्क राहावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्ण स्थितीची माहिती घेतली.
शुक्रवारपर्यंत महापालिका क्षेत्रात कोरोनाचे १० रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली असून, त्या सर्व रुग्णांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी चेतना नितील यांनी दिली. त्याचबरोबर सर्व आरोग्य केंद्रांत पुरेसा औषधसाठा उपलब्ध असून, तेथे टेस्टिंग कीटही आहेत, असेही त्यांनी सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे कोरोनाच्या रुग्णांसाठी १९ खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली. आरटीपीसीआर सुविधाही कळवा येथे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT