मुंबई

सप्तशृंगी इमारत दुर्घटनेतील बाधिताची पुनर्वसनाची मागणी

CD

पुनर्वसनासाठी पालिका आयुक्तांना साकडे
कल्याण, ता. २४ (वार्ताहर) : सप्तशृंगी इमारत दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले होते. दुर्घटना घडलेल्या इमारतीतील रहिवाशांच्या मदतकार्यासाठी पालिका प्रशासनाने इमारत रिकामी केली, तसेच रहिवाशांची तात्पुरती राहण्यासाठी व्यवस्था शाळेमध्ये केली आहे. याच इमारत दुर्घटनाग्रस्त रहिवाशांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी कल्याण-डोंबिवली आयुक्तांची शुक्रवारी (ता. २३) दुपारी भेट घेतली. तसेच त्यांची व्यथा आयुक्तांसमोर मांडली.
भाजप आमदार सुलभा गायकवाड, शिंदे गटाचे शिवसेना शहरप्रमुख नीलेश शिंदे हेदेखील रहिवासी शिष्टमंडळासबोत होते. इमारत खासगी मालमत्ता आहे. तसेच यासंदर्भात पुनर्वसन धोरण नसल्याने पुनर्वसन होऊ शकत नाही; मात्र इमारत रिडेव्हलपमेंटसाठी प्रस्ताव पालिकेकडे आल्यास पालिका प्रशासन मदत करेल, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. दुर्घटनाग्रस्त इमारत रहिवासी शिष्टमंडळात रेखा पाठारे, सुधीर लांवडे आदिसह इमारतीतील रहिवासी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Dhangar Shetkari News: पोटाची खळगी भरण्यासाठी मेंढपाळांची शेकडो किमीची पायपीट; वाढता उष्मा चारा पाण्याचं संकट, शिक्षणापासून वंचित पिढी..

Everest Base Camp: तन्मय नाईकने १७,४०० फूटांवर गाठले ध्येय, विरारचा ट्रेकर हिमालयात चमकला, ९ जणांतून एकटाच यशस्वी!

"म्हणून आम्ही मुलाचा विचार केला नाही" राकेशने केला मूल होऊ न देण्याच्या निर्णयाबाबतचा खुलासा

CIBIL स्कोर चेक करायला एक रुपयाही होणार नाही खर्च; काही सेकंदात मिळेल संपूर्ण रिपोर्ट, 'इथे' पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : शिरोलीत पक्ष्यांसाठी पाणवठे ठरले जीवनदायी; उन्हाळ्यात दिलासा

SCROLL FOR NEXT